CDAC Recruitment 2021: सीडॅक पुणे येथे 259 पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‌ॅडव्हान्समेंट म्हणजेच सीडॅकच्या वतीनं पुणे येथील विविध पदांसाठी पदभरती जाहीर केली आहे. पात्र उमदेवार सीडॅकच्या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात.

CDAC Recruitment 2021: सीडॅक पुणे येथे 259 पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 10:10 AM

पुणे: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‌ॅडव्हान्समेंट म्हणजेच सीडॅकच्या वतीनं पुणे येथील विविध पदांसाठी पदभरती जाहीर केली आहे. पात्र उमदेवार सीडॅकच्या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. प्रोजेक्ट इंजिनिअर्स, प्रोजेक्ट असोसिएट आणि प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण 259 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी तत्वावर केली जाणार असल्याचंही सीडॅक कडून सांगण्यात आलं आहे. सीडॅक ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येते.

शैक्षणिक पात्रता:

सीडॅकमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं बी.ई.बी.टेक, एमसीए, एम.ई. एमएससी किंवा पीएजडी झालेलं असणं आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली, पुणे आणि हैदराबाद येथे नोकरीसाठी रुजू व्हावे लागेल.

अर्जाचं शुल्क

खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्जाचं शुल्क 500 रुपये सादर करावं लागणार आहे. तर. एससी, एसटी, दिव्यांग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यासंह महिला उमेदवारांना फीमधून सवलत देण्यात आली आहे. अर्ज दाखल करणारे विद्यार्थी https://cdac.in/index.aspx?id=job_Cons_Sep_2021 या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

भेलमध्ये इंजिनिअर्सची भरती

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निर्माण जाली आहे. भेलकडून अभियांत्रिकी क्षेत्रातील उमेदवारांसाठी पदभरती जाहीर केली आहे. एकूण 22 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. भेलकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. अर्ज दाखल करण्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईट careers.bhel.in वर भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिममिटेडने इंजिनिअर सिव्हील आणि सुपरवायझर सिव्हील पदासांठी भरतीप्रक्रिया जाहीर केली आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. देशभरातील विवध शहरातील पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. भोपाळ , हरिद्वार, हैदराबाद, झाशी, रानीपेट,जगदीशपूर, त्रिची वायझॅक आणि दिल्ली येथील जागा भरण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 7 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर वेबसाईटवरुन लिंक हटवली जाणार आहे.

इतर बातम्या:

राज्य सेवेच्या नियुक्त्या द्या, आयोगासमोर आत्मदहन करु, MPSC ला विद्यार्थ्यांचा 10 सप्टेंबरचा अल्टिमेटम

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी

 CDAC Recruitment 2021 Pune invites Applications for the post of Project Engineers Project Associate and Project Support Staff

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.