उत्तम करिअरसाठी पदवीनंतर करा एमसीए अभ्यासक्रम, मिळेल भरघोस पगार

भारतीय एमसीए विद्यार्थ्यांना केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली मागणी आहे. संगणक क्षेत्रात रस असणारे तरुण एमसीए कोर्समध्ये सहभागी होऊ शकतात. (Do MCA course after graduation for a better career, get better salary)

उत्तम करिअरसाठी पदवीनंतर करा एमसीए अभ्यासक्रम, मिळेल भरघोस पगार
उत्तम करिअरसाठी पदवीनंतर करा एमसीए अभ्यासक्रम, मिळेल भरघोस पगार
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 6:11 PM

नवी दिल्ली : जगभरात वेगाने विकसित होत असलेल्या आयटी क्षेत्रासोबत पुढे जाणे ही आज सर्वात मोठी गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण जग ज्याची कल्पनाही केली नसेल अशा सर्व गोष्टी पाहू शकेल. अशा परिस्थितीत संगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर निवडणे म्हणजे उत्तम भविष्याच्या दिशेने पहिली पायरी असेल. संगणक क्षेत्रातील करिअरमधील एक पर्याय म्हणजे एमसीए म्हणजेच मास्टर ऑफ कॉम्प्यूटर अॅप्लिकेशन कोर्स. आयटी क्षेत्रातील नोकरीमध्ये भारतीय एमसीएधारकांची बरीच मागणी आहे. संगणक विश्लेषक आणि वेब कौशल्यांची मागणी अधिक आहे. भारतीय एमसीए विद्यार्थ्यांना केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली मागणी आहे. संगणक क्षेत्रात रस असणारे तरुण एमसीए कोर्समध्ये सहभागी होऊ शकतात. (Do MCA course after graduation for a better career, get better salary)

कोर्ससाठी आवश्यक पात्रता

एमसीए एक पदव्युत्तर पदवी प्रोग्राम आहे. यात प्रवेश घेण्यासाठी प्रथम आपल्याला आपली पदवी पूर्ण करावी लागेल. यासाठी आपण संगणक अॅप्लिकेशन क्षेत्रात पदवीधर असणे आवश्यक नाही. या कोर्समध्ये अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी प्रथम बीसीए / बीएससी / बीकॉम किंवा बीबीए पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली पाहिजे. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

एमसीएधारकांना वाढती मागणी

गेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहिल्यास, अनेक बड्या कंपन्या आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी एमसीए पदवीची मागणी करीत आहेत. एमबीए पदवीधारकास विप्रो, इन्फोसिस, इन्फोटेक, टाटा कन्सल्टन्सी, कॅपजेमिनी, सत्य महिंद्रा, एचसीएल आणि आयबीएम यासारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.

या कौशल्यांवर अधिक लक्ष केंद्रित करा

एमसीएची पदवी मिळविल्यानंतर आपल्याला एक चांगला प्रोग्रामर बनायचा असेल तर जावा, सी ++, नेट आणि एसीपी तसेच वेब डिझायनिंग यासारख्या संगणक प्रोग्रामिंग भाषांचे आपल्याला चांगले ज्ञान असले पाहिजे. तुम्हाला जर नेटवर्किंगच्या क्षेत्रात काम करायचे असेल तर तुम्हाला एसक्यूएल चे मूलभूत ज्ञान अससे पाहिजे.

पगार

आयटी क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्या विविध आधारावर आहेत. अशा परिस्थितीत सर्वसाधारण एमसीएधारकासाठी अॅप डेव्हलपरला प्रारंभिक वेतन म्हणून 20 ते 30 हजार रुपये, आयटी सहाय्यकास 10 ते 20 हजार, हार्डवेअर अभियंत्यास 15 ते 25 हजार, सॉफ्टवेअर अभियंत्याला 30 ते 40 हजार रुपये आणि वेब डिझायनर्सना 35 ते 45 हजार मिळते. (Do MCA course after graduation for a better career, get better salary)

इतर बातम्या

West Central Railway Recruitment 2021 : पश्चिम मध्य रेल्वेमध्ये 680 अप्रेंटिसची भरती, इच्छुकांनी 5 एप्रिलपर्यंत करा अर्ज

MES Recruitment 2021 : ड्राफ्ट्समन आणि सुपरवायझर पदासाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.