Government Jobs : परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी, २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

भारत हेवी इलेक्ट्ऱॉनिक्स लिमिटेड अर्थात BHELने एक नामी संधी उपलब्ध करुन दिली आहे. BHELने ट्रेड अप्रेंटिस पदासाठी विविध प्रकारची व्हॅकन्सी जारी केली आहे.

Government Jobs : परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी, २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा
भेल
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 2:48 PM

नवी दिल्ली : स्पर्धेच्या जगात कुठलीही परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळणं म्हणजे एक दिवास्वप्नच आहे. अशावेळी भारत हेवी इलेक्ट्ऱॉनिक्स लिमिटेड अर्थात BHELने एक नामी संधी उपलब्ध करुन दिली आहे. BHELने ट्रेड अप्रेंटिस पदासाठी विविध प्रकारची व्हॅकन्सी जारी केली आहे. या पदासाठी योग्य उमेदवाराची थेट भरती होणार आहे. या सरकारी नोकरीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा असणार नाही. BHELने या भरती प्रक्रियेसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे.(Government job opportunity without examination in BHEL)

BHEL ने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण 300 पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2021 आहे. भरतीसंबंधी पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण हे नोटिफिकेशन पाहू शकता.

अर्ज कसा कराल?

BHEL ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करायचा झाल्यास तुम्हाला NAPS पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. इथे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल. या नोंदणी क्रमांकाच्या सहाय्याने तुम्ही BHEL Bhopalच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करु शकता.

योग्यता आणि वयोमर्यादा

कुठल्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 10 वी पास असणं गरजेचं आहे. सोबतच संबंधित ट्रेडमध्ये ITI डिप्लोमा कोर्ट केलेला असावा. असे उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकणार आहेत. उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहेत. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत नियमानुसार वाढ केली गेलेली आहे.

कोणत्या पदांसाठी भरती

या भरती प्रक्रियेत इलेक्ट्रिशियन पदाच्या 80, फिटरच्या 80, वेल्डरच्या 20, टर्नरच्या 20, मशीनिस्टच्या 3, ड्राफ्ट्समॅनच्या 5, इलेक्ट्रॉनिस्क (मॅकेनिक)च्या 5, COPA/PASAA पदासाठी 30, सोबतच प्लंबर, बढई, मॅकेनिक मोटार वाहन, मशीनिस्ट (ग्राइंडर), ब्रिकलेयर (MES)आणि पेंटर अशा पदांसाठी 5. या सर्व मिळून एकूण 300 पदांसाठी ही भरती होणार आहे.

10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी

SSC MTS 2020 परीक्षा 1 जुलै ते 20 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSCने शुक्रवारी मल्टी टास्किंग स्टाफ अर्थात MTS भरती परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरु केली आहे. जे लोक 10वी पास आहेत ते या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च आहे.

या भरती प्रक्रियेत 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. मात्र, आरक्षणानुसार वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे. SSC ऑनलाईन टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर हा क्वालीफाय प्रकारचा आहे आणि तो उमेदवाराच्या भाषा कौशल्याबद्दल जाणून घेण्यासाठी घेतली जाते.

संबंधित बातम्या :

SSC MTS 2020 : 10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी, रजिस्ट्रेशन सुरु

Job Alert: दहावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी; अनेक पदांवर भरती

Government job opportunity without examination in BHEL

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.