Hindustan Petroleum : ‘इंजिनिअरिंग डिप्लोमा’ वाले तुम्हारा टाईम आगया ! हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 186 जागांसाठी भरती, बातमी वाचा अर्ज करा…
अर्जासाठीची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 25 वर्षे असावं.
विशाखापट्टणम : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Engineering Diploma) वाले तुम्हारा टाईम आगया ! खास तुमच्यासाठी ही बातमी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमकडून (Hindustan Petroleum) 186 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. विविध पदांनुसार उमेदवारांकडून अर्ज (Application) मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन करता येऊ शकतो. अर्जासाठीची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 25 वर्षे असावं.
पदाचे नाव आणि पदांनुसार उपलब्ध जागा
एकूण जागा – 186
1. ऑपरेशन्स टेक्निशियन – 94 जागा
2. बॉयलर टेक्निशियन – 18 जागा
3. मेंटेनन्स टेक्निशियन (मेकॅनिकल) – 14 जागा
4. मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 17 जागा
5. मेंटेनन्स टेक्निशियन (इंस्ट्रुमेन्टेशन) – 09 जागा
6. लॅब अनॅलिस्ट – 16 जागा
7. ज्युनिअर फायर अँड सेफ्टी इन्स्पेक्टर – 18 जागा
शैक्षणिक पात्रता
1. ऑपरेशन्स टेक्निशियन – केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2. बॉयलर टेक्निशियन – 1) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 2) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
3. मेंटेनन्स टेक्निशियन (मेकॅनिकल) – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
4. मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
5. मेंटेनन्स टेक्निशियन (इंस्ट्रुमेन्टेशन) – इंस्ट्रुमेंटेशन किंवा इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल/ इंस्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
6. लॅब अनॅलिस्ट – 60% गुणांसह विज्ञान B.Sc (PCM) किंवा 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)
7. ज्युनिअर फायर अँड सेफ्टी इन्स्पेक्टर – 1) 40% गुणांसह विज्ञान पदवीधर 2) अवजड वाहन चालक परवाना
वयाची अट
18 ते 25 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
वेतन – 26,000/- ते 76,000/-
अर्ज शुल्क
General/ OBC-NC/ EWS – 590/-
ST/ SC/ PwBD – शुल्क नाही
महत्त्वाचे
नोकरीचे ठिकाण – विशाख रिफायनरी ( विशाखापट्टणम )
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022
अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/
जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज – Click Here
टीप : कृपया अधिकृत माहितीसाठी हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
इतर बातम्या :