AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Jobs : मुंबईत नोकरीची संधी ! राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेअंतर्गत भरती सुरु, ‘ही’आहे अर्ज करायची शेवटची तारीख

मुंबईतल्या राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेत नोकऱ्या उपलब्ध आहेत. विविध पदांच्या एकूण 10 रिक्त जागा आहेत. पदांसाठी लागणारी पात्रता ही त्या-त्या पदांनुसार असणार आहे.

Mumbai Jobs : मुंबईत नोकरीची संधी ! राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेअंतर्गत भरती सुरु, 'ही'आहे अर्ज करायची शेवटची तारीख
मुंबईत नोकरीची संधी !Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 2:55 PM

मुंबई : मुंबईतल्या राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेत नोकऱ्या (Jobs) उपलब्ध आहेत. विविध पदांच्या एकूण 10 रिक्त जागा (Vaccancies) आहेत. पदांसाठी लागणारी पात्रता ही त्या-त्या पदांनुसार असणार आहे. अर्ज (Application) करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 असून उमेदवार ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर) किंवा ऑनलाईन (ईमेलद्वारे) पद्धतीने अर्ज करू शकतात. किमान वय 18 आणि कमाल वय 25 असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या पदांसाठीची निवड परीक्षा घेऊन करण्यात येणार आहे. शिकाऊ उमेदवाराच्या पदांसाठीच्या या जागा आहेत त्यामुळे नुकतंच पासआऊट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे असं म्हणायला हरकत नाही. बी.कॉम (B.Com), बीए (BA), बी.एससी आयटी (B.Sc IT) आणि सीएस (CS) मध्ये पदवीधर असणारे उमेदवार या राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थे अंतर्गत निघालेल्या जागांवर अर्ज करू शकतात.

अर्ज कुठे पाठवणार ?

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, NITIE, विहार लेक रोड, पवई, मुंबई – 400087 ईमेल आयडी – nitierecruit@nitie.ac.in

पदासंदर्भात माहिती

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

एकूण जागा – 10

शैक्षणिक पात्रता – बी.कॉम (B.Com), बीए (BA), बी.एससी आयटी (B.Sc IT) आणि सीएस (CS) मध्ये पदवीधर

वयाची अट – 18 ते 25 वर्षांपर्यंत

वेतन – 12000

महत्त्वाचे

अर्ज शुल्क – नाही

निवड करण्याची पद्धत – टेस्ट

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन ( ईमेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.nitie.edu/

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार.
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्...
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्....
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष.
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन.
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.