Indian Army : सैन्यात भरती होण्यास इच्छुक ? ही बातमी तुमच्यासाठीच !
या भरतीची जाहिरात १२ मार्च रोजी प्रसारित करण्यात आली होती. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत ३० एप्रिल २०२२ पर्यंत आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी मुदती आधीच आपला अर्ज भरावा.
नवी दिल्ली : जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी (Government Job) तयारी करत असाल आणि सैन्यात भरती होण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. भारतीय सेना (बंगाल इंजिनियरिंग ग्रुप) रूडकी केंद्राने ग्रुप बी आणि ग्रुप सी रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. भारतीय सेना (Indian Army) रूडकी केंद्र ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील रिक्त जागांसाठी अर्ज मागवत आहेत. या भरतीची जाहिरात 12 मार्च रोजी प्रसारित करण्यात आली होती. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत 30 एप्रिल 2022 पर्यंत आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी मुदती आधीच आपला अर्ज भरावा. या भरतीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणारे उमेदवार या बातमीचा आधार घेऊन खाली दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज भरू शकतात.
इतक्या पदांवर होणार भरती
भारतीय सेनेकडून या भरतीप्रक्रियेत एकूण 36 रिक्त पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना एलडीसी (LDC), स्टोअर किपर 2, कूक, MTS/ चौकीदार, लस्कर इत्यादींच्या रिक्त पदांवर नियुक्त केलं जाईल.
कुठल्या पदासाठी किती जागा
- एलडीसी – 4
- स्टोअर किपर 2-3
- रसोईया – 19
- एमटीएस / चौकीदार – 5
- लस्कर – 2
- वॉशर मॅन – 3
शैक्षणिक योग्यता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता त्या-त्या पदांनुसार आहे. एलडीसी, स्टोअर किपर पदासाठी 12 वी पास, कूक, MTS/ चौकीदार, लस्कर इत्यादी पदांच्या भरतीसाठी 10 वी पास असणं आवश्यक आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष ते कमाल वयोमर्यादा 25 वर्षे इतकी आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेची अट नाही.
अर्ज कसा करायचा ?
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन ठेवण्यात आली आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज भरून महत्त्वाच्या कागदपत्रांसहित तो Commandant, Bengal Engineer Group and Cente, Roorkee, Haridwar, Uttarakhand- 247667 या पत्त्यावर पाठवावा.