Indian Army : भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड ‘ग्रुप C’ पदांच्या एकूण 70 रिक्त जागा, ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज, 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी
वयाची अट किमान 18 वर्षे ते कमाल 27 वर्षे अशी आहे. या पदांसाठीची पोस्टींग संपूर्ण भारतात असणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाच्या (Indian Army) हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड ‘ग्रुप C’ पदांच्या एकूण 70 जागांसाठी पात्र उमेदवारांचे (Candidates) अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 आहे. या उपलब्ध जागा (Vaccancies) वार्ड सहाय्यिका आणि आरोग्य निरीक्षक पदांसाठीच्या आहेत. वार्ड सहाय्यिका पदासाठी वयाची अट किमान वय 18 आणि कमाल वय 25 आहे. आरोग्य निरीक्षकासाठीची ( Health Inspector) वयाची अट किमान 18 वर्षे ते कमाल 27 वर्षे अशी आहे. या पदांसाठीची पोस्टींग संपूर्ण भारतात असणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. आरोग्य निरीक्षक पदासाठी सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्सचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. १०वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.
अधिकृत वेबसाईट
अर्ज पाठवायचा पत्ता
Command Hospital (WC) Chandimandir – 134107
पदाचे नाव आणि जागांचं वर्गीकरण
एकूण जागा – 70
वार्ड सहाय्यिका – 51 जागा हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) – 19 जागा
वयाची अट
वार्ड सहाय्यिका – 18 ते 25 वर्षे हेल्थ इन्स्पेक्टर ( आरोग्य निरीक्षक ) – 18 ते 27 वर्षे
शैक्षणिक पात्रता
1) वार्ड सहाय्यिका – 10वी उत्तीर्ण
2) हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) – 1) 10वी उत्तीर्ण 2) सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र
महत्त्वाची माहिती
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2022
मूळ जाहिरात आणि अर्जाचा नमुना – PDF बघावी
टीप – अधिकृत माहितीसाठी कृपया भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
इतर बातम्या :