IBPS RRB PO Result 2021 : आरआरबी पीओ भरती परीक्षेचा निकाल जाहीर, असा तपासा
सामान्य श्रेणीच्या उमेदवारांसाठी 1666 जागा, ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 387 जागा, ओबीसी उमेदवारांसाठी 1100 जागा, अनुसूचित जाती प्रवर्गांसाठी 420 आणि एसटी प्रवर्गातील 303 जागा असतील.
IBPS RRB PO Result 2021 : इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनतर्फे आरआरबी पीओ भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत, जे उमेदवार आरआरबी ऑफिसर स्केल-1 परीक्षेत बसले होते ते अधिकृत वेबसाईट ibps.in ला भेट देऊन निकाल (IBPS RRB PO Result 2021) तपासू शकतात. ही परीक्षा एकूण 3,876 पदांच्या भरतीसाठी घेण्यात आली होती. आरआरबी ऑफिसर स्केल 1 (Officers(Scale-I)) या पदावर भरतीसाठी जारी केलेल्या या रिक्त जागेसाठी अर्ज प्रक्रिया 8 जून 2021 रोजी सुरू झाली. यासाठी उमेदवारांना 28 जून 2021 पर्यंत वेळ देण्यात आला होता. रिक्त पदासाठी परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली होती. याचा निकाल (IBPS RRB PO Result 2021) अधिकृत वेबसाईट- ibps.in वर जाहीर करण्यात आला आहे. (IBPS RRB PO Result 2021 declaired, check on official website)
असा पहा निकाल
– निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट- ibps.in वर जा. – वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर दिलेल्या IBPS RRB resultच्या पर्यायावर जा. – आता RRBs (CRP-RRBs-X) for Recruitment of Group “A” – Officers(Scale-I) वर जा. – यामध्ये नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने निकाल तपासा. – निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. – थेट लिंकवरून निकाल तपासण्यासाठी येथे क्लिक करा.
रिक्त पदाचा तपशील
RRB द्वारे जारी केलेल्या या रिक्त जागेत एकूण 3876 पदांसाठी भरती केली जाईल. सामान्य श्रेणीच्या उमेदवारांसाठी 1666 जागा, ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 387 जागा, ओबीसी उमेदवारांसाठी 1100 जागा, अनुसूचित जाती प्रवर्गांसाठी 420 आणि एसटी प्रवर्गातील 303 जागा असतील.
मुख्य परीक्षा
जे उमेदवार IBPS RRB प्रीलिम्स निकाल 2021 मध्ये पात्र झाले आहेत त्यांना 25 सप्टेंबर 2021 रोजी (IBPS RRB PO Mains 2021 kab) IBPS RRB मुख्य परीक्षा 2021 मध्ये उपस्थित राहावे लागेल. IBPS RRB PO 2021 चा अंतिम निकाल मुख्य परीक्षेनंतर जाहीर केला जाईल. आरआरबी पीओ भर्ती प्रक्रिया IBPS लवकरच RRB PO कट-ऑफ अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करेल.
आरआरबी पीओ भरती 2021
ही तीन टप्प्यातील भरती प्रक्रिया आहे. पात्र उमेदवारांना भारताच्या प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) म्हणून भरती केले जाईल. भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर IBPS RRB कट-ऑफ पूर्ण करणे अनिवार्य आहे. आयबीपीएस प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (आरआरबी) गट “ए”-अधिकारी (स्केल- I, II आणि III) च्या पदांसाठी भरती मोहीम राबवत आहे. (IBPS RRB PO Result 2021 declaired, check on official website)
Narayan Rane Arrest : नारायण राणे यांना मोठा दिलासा, न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जामीन मंजूर, आता राणे काय भूमिका घेणार? https://t.co/xm964gt9ju @MeNarayanRane @OfficeofUT @BJP4Maharashtra @ShivSena @NiteshNRane #NarayanRaneArrested #NarayanRaneLive #BailGranted #Magistrate #Mahad
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 24, 2021
इतर बातम्या
साताऱ्यात 24 वर्षीय तरुणाकडून गांजाची तस्करी, सापळा रचून पोलिसांनी ठोकल्या बेड्या