ICAI CA Intermediate result 2021 : आयसीएआय सीए इंटर परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार, रिझल्ट कुठं पाहणार?
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, आयसीएआयने (ICAI) सीए (CA Inter) इंटरमिडीएट परीक्षेच्या निकालाची (Result) विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.

नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, आयसीएआयने (ICAI) सीए (CA Inter) इंटरमिडीएट परीक्षेच्या निकालाची (Result) विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. अद्यापही आयसीएआयकडून निकालासंदर्भातील कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. डिसेंबर 2021 सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल 26 फेब्रुवारीपर्यंत जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. आयसीएआयच्या icai.org या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर icai.org भेट देऊन नोंदणी क्रमांक आणि पिन द्वारे पाहता येईल. आयसीएआयकडून सीए फाऊंडेशन परीक्षेचा निकाल 10 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आलेला आहे.
निकालाच्या अपेक्षित तारखा जाहीर
आयसीएआय सीए इंटरमिडिएट परीक्षा डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलं होतं. 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती. आयसीएआयचे सीसीएम धीरज खंडेलवाल यांनी इंटरमिडीएट परीक्षेच्या निकालाची अपेक्षित तारीख जाहीर केली होती. उमेदवारांना त्यांच्या ईमेलवरही निकाल मिळू शकतो, यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org ला भेट देऊन निकाल जाहीर होण्यापूर्वी नोंदणी करावी लागेल. नोंदणी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना निकाल लागताच त्यांच्या ईमेलवर पाठवले जाईल.
ICAI CA Result 2021 या स्टेप्स करा चेक
स्टेप 1 : उमेदवार अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर भेट द्या. स्टेप 2 : आता वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3 : त्यानंतर विनंती केलेली माहिती सबमिट करून लॉगिन करा. स्टेप 4 : तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. स्टेप 5 : पुढील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढा
निकालासंबंधी तक्रार कशी नोंदवणार
विद्यार्थ्यांना जर सीए इंटर निकालाबद्दल शंका असेल तर तो ICAI CA पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात. आयसीएआयनं विद्यार्थ्यांना foundation_examhelpline@icai.in, intermediate_examhelpline@icai.in या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे. सीए इंटर परीक्षेचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल.
इतर बातम्या :
पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला
प्रवीण दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात, मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार; घातपाताचा संशय