IDBI Bank Recruitment 2021 : आयडीबीआय बँकेत 920 जागांसाठी भरती, 29 हजारापर्यंत पगार मिळणार

आयडीबीआय बँक कार्यकारी पदांवर कंत्राटी पद्धतीने पात्र उमेदवारांची देशभरातील विविध शाखांमध्ये नेमणूक करणार आहे.

IDBI Bank Recruitment 2021 : आयडीबीआय बँकेत 920 जागांसाठी भरती, 29 हजारापर्यंत पगार मिळणार
आयडीबीआय बँक
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 2:30 PM

नवी दिल्ली: आयडीबीआय बँकेने 2021 मधील भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. आयडीबीआय बँक कार्यकारी पदांवर कंत्राटी पद्धतीने पात्र उमेदवारांची देशभरातील विविध शाखांमध्ये नेमणूक करणार आहे. कार्यकारी पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात 4 ऑगस्ट पासून झाली असून अखेरचा दिवस 18 ऑगस्ट आहे. 920 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

एक वर्षाच्या करारावर नेमणूक

पात्र उमेदवार आयडीबीआय बँकेचा अधिकृत वेबसाईट idbibank.in वर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. बँक कार्यकारी पदावरील उमेदवारांची नियुक्ती फक्त एका वर्षासाठी करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या कामगिरीवर त्यांचा कार्यकाळ पुढील दोन वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो.

पदांचा तपशील

आयडीबीआय बँकेने 920 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय 20 ते 25 च्या दरम्यान असावं, असं बँकेतर्फे जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी भारत सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून 55 टक्केंनी पदवी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तर, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50 टक्क्यांची अट निश्चित करण्यात आली आहे.

अर्जाचं शुल्क

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारासाठी अर्जाचे शुल्क 200 रुपये आहे, इतर प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 1000 रुपये भरावे लागणार आहे.

अर्ज सादर कसा करायचा?

स्टेप 1: आयडीबीआय बँकेचा वेबसाईटला भेट द्या. स्टेप 2: होम पेज वरील करिअर या लिंकवर क्लिक करा स्टेप 3: पुढे कार्यकारी कंत्राटी भरती 2021 वर क्लिक करा स्टेप 4: अर्ज दाखल करण्यासाठी नवीन नोंदणी करा स्टेप 5: नोंदणी केल्यानंतर आवश्यक माहिती भरा स्टेप 6:आवश्यक माहिती भरल्यानंतर अर्ज दाखल करा स्टेप 7: सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर परीक्षेचे फी भरा स्टेप 8:अर्जाची प्रत डाऊनलोड करून पुढील माहितीसाठी त्याची प्रिंट आऊट घेऊन सोबत ठेवा

पगार किती?

आयडीबीआयच्या कार्यकारी पदासाठी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर 5 सप्टेंबरला परीक्षा आयोजित केली जाणार आहे. तर, निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी 29 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 31 हजार तर तिसऱ्या वर्षी 34 हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे.

इतर बातम्या:

VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल

वाहतूक पोलिसांच्या ई- चालानचा धाक कमी? दीड लाख वाहनचालकांनी दंड थकवला

IDBI bank recruitment 2021 apply for 920 post for executives check details here

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.