Railway Jobs : ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन, 10 वी पास उमेदवारांना उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिसची संधी
भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व रेल्वेनं यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केलं आहे. उत्तर पूर्व रेल्वेमध्ये 1664 पदांवर अप्रेंटिससाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
नवी दिल्ली: भारतीय रेल्वे अप्रेंटिस करण्याची इच्छा असणाऱ्या दहावी पास उमेदवारांना चांगली संधी आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व रेल्वेनं यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केलं आहे. उत्तर पूर्व रेल्वेमध्ये 1664 पदांवर अप्रेंटिससाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमदेवार नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे.
अप्रेंटिस भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस कायदा 1961अंतर्गत भारतीय रेल्वेच्या विविध विभागात, कार्यशाळा आणि एनसीआर न्यायक्षेत्रातील म्हणजेच प्रयागराज, आग्रास झांशी वर्कशॉपमध्ये अप्रेंटिस करता येणार आहे.
पात्रता
अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण आवश्यक असून त्याशिवाय संबंधित ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. वेल्डर, वायरमन, कारपेंटर या अभ्यासक्रमातील आयटीआय उत्तीर्ण आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमीत कमी वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील केलेली आहे. फ्रेशर्स, आयटीआय आणि लॅब टेक्निशियन यांच्यासाठी वायीच अट 22 वर्ष आहे.
उमेदवारांची निवड कशा प्रकारे होईल?
उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआय मध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
अर्ज कसा करायचा?
स्टेप 1: नॉर्थ सेंट्रल रेल्वेच्या वेबसाईटला भेट द्या
स्टेप 2: होमपेजवरील अप्रेंटिस भरती 2021 लिकंवर क्लिक करा
स्टेप 3 : मोबाईल नंबर आणि ईमेल द्वारे लॉगीन करा
स्टेप 4 : लॉगीन केल्यानंतर सर्व आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा
स्टेप 5 : अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा
अर्जाचे शुल्क
खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. तर, एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही.
इतर बातम्या:
Railway Jobs : 10वी पाससाठी तरुणांसाठी मोठी संधी, कुठल्याही परीक्षेविना मिळवा नोकरी
Indian Railway Apprentice Recruitment registrations started for 1664 post class 10 th pass can apply