AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे विभागात मेगा भरती, तब्बल 10884 पदांसाठी भरती, बारावी पास ते…

Indian Railway Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार आहे. रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून विविध जागा या भरल्या जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

रेल्वे विभागात मेगा भरती, तब्बल 10884 पदांसाठी भरती, बारावी पास ते...
Railway
Follow us
| Updated on: Aug 01, 2024 | 7:43 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे लवकरच भरती प्रक्रियेला सुरूवात होणार असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती राबवली जात आहे. भरती प्रक्रियेसाठी आपण कुठेही बसून आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

रेल्वे विभागाकडून 10884 पदांवर ही भरती सुरू आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिक, लेखा लिपिक, वरिष्ठ लिपिक, लेखा सहाय्यक, कमर्शियल अप्रेंटिस, स्टेशन मास्टर अशी विविध पदे भरली जातील. मुळात म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. 

फक्त शिक्षणाचीच अट नाही तर या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. 18 ते 33 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. बारावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 500 रूपये फीस ही भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना थोडी सूट देण्यात आलीये.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगलाच पगार मिळणार आहे. indianrailways.gov.in. या साईटवर जाऊन उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल. मात्र, अजून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली नाहीये. लवकरच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. indianrailways.gov.in. या साईटवर सविस्तर माहिती मिळेल.

भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा.
भारताचा दुश्मन मसूद अजहर अन हाफिज सईदचा खात्मा? बघा हल्ल्याचे व्हिडीओ
भारताचा दुश्मन मसूद अजहर अन हाफिज सईदचा खात्मा? बघा हल्ल्याचे व्हिडीओ.
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर.
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.