ChatGPT मध्ये नोकरीची ऑफर, पगार मिळणार तब्बल 3.7 कोटी रुपये, या उमेदवारांना संधी
कुत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत ChatGPT या सॉफ्टवेअरला OpenAI कंपनीने गेल्यावर्षी लॉंच केले होते. तेव्हा पासून हे चॅटजीपीटी खूपच चर्चेत आहे.
नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : ChatGPT तसेच अन्य कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सॉफ्टवेअरच्या वाढत्या प्रभावाने अनेकाच्या नोकऱ्या जातील असे म्हटले जात आहे. परंतू ChatGPT ची निर्माण करणारी कंपनी OpenAI ने काही नोकऱ्याही तयार केल्या आहेत. या पदासाठी कंपनीने 3.7 कोटी रुपयांपर्यंतच्या तगड्या पॅकेजच्या ऑफर दिली आहे. या पदाच्या भरतीसाठी कंपनी उमेदवारांच्या शोधात आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्यानेच ही माहीती दिली आहे.
कुत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत ChatGPT या सॉफ्टवेअरला OpenAI कंपनीने गेल्यावर्षी लॉंच केले होते. तेव्हा पासून हे चॅटजीपीटी खूपच चर्चेत आहे. या सॉफ्टवेअरमुळे कवी, लेखक आणि कंटेट रायटर सारख्यांची नोकरीच जाईल असे म्हटले जात होते. परंतू या नव्या प्लॅटफॉर्मलाच आता नोकरांची गरज आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की आम्हाला नवीन टॅलेंट हवे आहे. या उमेदवारांना कोडींग, मशिन लर्निंग आणि अन्य बाबीची चांगली माहीती हवी आहे. यासाठी कंपनी वार्षिक 3.7 कोटीचे पॅकेज देण्याची तयारी दाखविली आहे.
ओपनआयने दिली माहीती
ओपनआयचे सुपर अलाईनमेंट टीमचे हेड Jan Leike यांनी या नोकऱ्याची माहीती दिली आहे. The 80,000 hours podcast मध्ये त्यांनी खुलासा केला आहे. रिसर्च बेस्ड जॉब आणि इतरही पोस्ट खाली आहेत. कंपनीला अनेक रिसर्च इंजिनिअर, रिसर्च मॅनेजर आणि रिसर्च सायटीस्टची गरज आहे.
खरंच नोकरी जाणार
सोशल मिडीया असो किंवा सर्वसामान्य नोकरपेशा मंडळीत आपल्या नोकऱ्या चॅटजीपीटी सारख्या प्लॅटफॉर्ममुळे जातील याची चर्चा सुरु आहे. काही लोक याचा वापर करुन चांगले कॉपीरायटर बनले आहेत. काही लोकांच्या नोकऱ्यांमुळे यावर संकट ओढवले आहे. कंटेट रायटर मंडळींचे चॅट जीपीटीने धाबे दणाणले आहेत.
किती पॅकेज मिळणार
ओपनआयच्या सुपर अलाईनमेंट टीममध्ये रिसर्च इंजिनियर्सना सेफ्टी रिसर्च टीममध्ये काही एक्सपेरिमेंट आणि डीझाईन करण्यासाठी उमेदवारांची गरज आहे. या नोकरीत वार्षिक 2,45,000 अमेरिकन डॉलर ( सुमारे 2 कोटी रुपये ) ते 4,50,000 अमेरिकन डॉलर ( सुमारे 3.7 कोटी रु.) पर्यंत पगार आहे. याशिवाय एक्स्ट्रा अलाऊन्स देखील सामील.