बेरोजगारांना सुवर्ण संधी; इथे निघालीये बंपर भरती, जाणून घ्या सविस्त माहिती एका क्लिकवर

बँकेत काम करण्याची इच्छा आहे? मग विचार कसला करताय. आयडीबीआय बँकेने बंपर भरती जाहीर केली आहे.

बेरोजगारांना सुवर्ण संधी; इथे निघालीये बंपर भरती, जाणून घ्या सविस्त माहिती एका क्लिकवर
job
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 7:48 PM

बँकेत काम करण्याची इच्छा आहे? मग विचार कसला करताय. आयडीबीआय बँकेने बंपर भरती जाहीर केली. आयडीबीआय बँकेने एक्झिक्युटिव्ह (सेल्स अँड ऑपरेशन्स) पदाच्या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अधिकृत अधिसूचनेनुसार, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर आहे, तर ऑनलाइन परीक्षेची संभाव्य तारीख 1 डिसेंबर आहे.

किती रिक्त पदे? 

IDBI बँकेने बंपर भरती जाहीर केली असून या भरतीत एक्झिक्युटिव्ह (सेल्स अँड ऑपरेशन्स) ची एकूण एक हजार पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 448 पदे, अनुसूचित जमातीसाठी 94 पदे, अनुसूचित जातींसाठी 127 पदे, ओबीसीसाठी 231 पदे, EWS साठी 100 पदे आणि दिव्यांगांसाठी 40 पदे राखीव आहेत.

IDBI बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम IDBI बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन atidbibank.in. त्यानंतर होमपेजवरील ‘रिक्रूटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह (सेल्स अँड ऑपरेशन्स): 2025-26’ टॅबवर क्लिक करा. त्यानंतर अ‍ॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करा आणि प्रक्रिया पुढे जा. आवश्यक तपशीलांसह स्वत: ची नोंदणी करा आणि लॉगिन करा. अर्ज अचूक भरा आणि अर्ज शुल्क भरा. फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी घ्या.

IDBI बँक भरतीचे पात्रता निकष काय?

शैक्षणिक पात्रता: उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 20 ते 25 वर्षादरम्यान असावे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1999 पूर्वी आणि 1 ऑक्टोबर 2004 नंतर नसावा.

 अर्ज शुल्क किती?

एससी/एसटी/पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये, तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 1050 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क डेबिट/क्रेडिट किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन भरले पाहिजे.

कशी आहे निवड प्रक्रिया?

IDBI बँक ईएसओ पदांसाठी निवड प्रक्रियेत ऑनलाईन चाचणी, कागदपत्र पडताळणी, वैयक्तिक मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीचा समावेश आहे. या परीक्षेत लॉजिकल रिझनिंग, डेटा अ‍ॅनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड आणि जनरल/इकोनॉमिक/बँकिंग अवेअरनेस/कॉम्प्युटर/आयटी या विषयांचे प्रश्न असतील. 120 मिनिटांच्या या परीक्षेत एकूण 200 प्रश्न असतील. लक्षात ठेवा, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक मार्किंग म्हणून 0.25 गुण कापले जातील.

अधिकृत वेबसाईट कोणती?

उमेदवार IDBI बँकेच्या www.idbibank.in. या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. यावर सविस्तर माहिती मिळेल.

Non Stop LIVE Update
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय.
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?.
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?.
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?.
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल.