BMC Jobs : उठा उठा हो सकळीक… ही नोकरी बघा ! परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे होणार निवड
अर्ज शुल्क सगळ्यांनाच 590/- रुपये आहे. ही भरती पूर्णतः काँट्रॅक्ट बेसिसवर आहे. योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीचं वेळापत्रक नायर हॉस्पिटलच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केलं जाईल.
मुंबई : बृहन्मुंबई महानगपालिकेने (BMC) असिस्टंट प्रोफेसरच्या (Assitant Professor) जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलीये. तीन रिक्त पदांसाठी ही जागा असून नोकरीचं ठिकाण मुंबई असणारे. अर्ज ऑफलाइन (Offline Application) पद्धतीनं खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. 17 मे 2022 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 38 पेक्षा जास्त नसावं. अर्ज शुल्क सगळ्यांनाच 590/- रुपये आहे. ही भरती पूर्णतः काँट्रॅक्ट बेसिसवर आहे. योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीचं वेळापत्रक नायर हॉस्पिटलच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केलं जाईल. इच्छुक उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला हजर राहावे.
अर्ज पाठवायचा पत्ता
डिस्पॅच विभाग, टी.एन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008
- पदाचं नाव – सहाय्यक प्राध्यापक
- रिक्त पदे – 03 पदे
- नोकरीचं ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
- अर्ज करायची शेवटची तारीख – 17 मे 2022
- अर्ज शुल्क – 590/-
- वयाची अट – कमाल 38 वर्षे
- शैक्षणिक पात्रता – MD/ MS/ DNB
- निवड पद्धत – मुलाखत
- Official Website – Click Here
- Notification _ Click Here
टीप – अधिकृत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.