Maharashtra Board SSC Results 2022: निकाल तुमचा, जबाबदारी TV9 मराठीची! जस्सं बारावीच्या वेळी तसंच, एकाच क्लिकवर निकाल हातात!
Maharashtra Board SSC exam Results 2022: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला एक सोप्पी गोष्ट करायची आहे. बारावीप्रमाणे दहावीचा देखील निकाल तुम्हाला आमच्या TV9 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे.
मुंबई: आता पालक आणि विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची. 8 जूनला बारावीचा निकाल लागला. आता सगळ्यांचं लक्ष आहे दहावीच्या निकालावर (SSC Results).शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल असं सांगितलं होतं. लवकरच दहावीच्या निकाला बाबत आवश्यक माहिती जारी होऊ शकते. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा रोल नंबर आणि आईचं नाव अशी माहिती विद्यार्थ्यांकडे असावी. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Results) पाहण्यासाठी तुम्हाला एक सोप्पी गोष्ट करायची आहे. बारावीप्रमाणे दहावीचा देखील निकाल तुम्हाला आमच्या TV9 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तुम्हाला निकालाची घोषणा झाल्यावर TV9 मराठीच्या वेबसाईटवर करिअर सेक्शनमध्ये (TV9 Marathi) कुठेही ही लिंक सहज उपलब्ध होणार आहे किंवा तुम्ही इथे क्लिक करून सुद्धा तुमचा दहावीचा निकाल सहज मिळवू शकता.
फक्त एक क्लिक आणि निकाल हाती
- दहावीचा निकाल लागला रे लागला की तुम्ही लगेच TV9 मराठीच्या वेबसाईटला भेट द्या
- आमच्या करिअर विभागात महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2022 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा
- आमच्या होम पेजवर यायचं,तिथे असणाऱ्या महाराष्ट्र बोर्ड 10वी निकालाच्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही थेट निकाल पाहू शकता
- आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा
- यानंतर सबमिटवर क्किक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल
- डाऊनलोड ऑप्शनवर क्लिक करा आणि निकाल डाऊनलोड करा.
- प्रिंट ऑप्शनवर क्लिक करा, निकालाची प्रिंट काढून घ्या आणि पुढील वापरासाठी जवळ ठेवा.
रिझल्ट चेक करताना काय महत्त्वाच्या बाबी
- संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.
- सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी
- सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे
- आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येणार आहे
- महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल वेबसाईट