MPSC Update | PSI पदाची शारीरिक चाचणी, मुलाखत लांबणीवर, अवकाळी पावसामुळे एमपीएससीचा निर्णय
एमपीएससी आयोगने अवकाळी पावसामुळे एमपीएससी गट ब PSI 2019 च्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. पुणे आणि कोल्हापूर केंद्रावर 2 डिसेंबर रोजी ही परीक्षा होणार होती.
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचा फटका एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना बसला आहे. एमपीएससी आयोगने अवकाळी पावसामुळे एमपीएससी गट ब PSI 2019 च्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. पुणे आणि कोल्हापूर केंद्रावर 2 डिसेंबर रोजी ही परीक्षा होणार होती. एमपीएससीनं याबाबत एक अधिकृत परीपत्रक काढलं आहे.
शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलला
एमपीएससी आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआय करीता पुणे व कोल्हापूर केंद्रावर मुलाखत आणि शारीरिक चाचणी घेतली जाणार होती. 1 व 2 डिसेंबर रोजी शारीरिक चाचणी तर 2 डिसेंबर रोजी मुलाखती घेण्यात येणार होत्या. मात्र आता अवकाळी पावसामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दोन वेळा PSI पदाच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम ढकलण्यात आलाय.
दोन वर्षांपासून प्रक्रिया लांबली
2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीकडील इतर कारणांमुळं ही भरती प्रक्रिया लांबत चाललीय.
सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर होणार
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक पदांच्या 496 जागांसाठी ही प्रक्रिया सुरु आहे. पुणे आणि कोल्हापूर केंद्रावरील पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची शारीरिक चाचणी आणि मुलाखती यासाठी नव्यानं तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. एमपीएससीकडून सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
496 पदांसाठी राबवली जाणार शारीरिक चाचणीची प्रक्रिया
दरम्यान, तब्बल दोन वर्षानंतर एमपीएससीकडून ( महाराष्ट्र दुय्यम सेवा ) पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखती घेण्यात येत आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीच्या दिरंगाईपणामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. 496 पदांसाठी ही शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र आता अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा ही परीक्षा लांबवणीवर टाकण्यात आलीय.
इतर बातम्या :