AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC : सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी अर्ज करा, पूर्व परीक्षेच्या सुधारित निकालानंतर आयोगाचं आवाहन

सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 च्या सुधारित निकालानुसार मुख्य परीक्षेस नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आलीय.   20 ऑक्टोबर 2021 ते दिनांक 26 ऑक्टोबर 2021 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MPSC : सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी अर्ज करा, पूर्व परीक्षेच्या सुधारित निकालानंतर आयोगाचं आवाहन
MPSC EXAM
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 6:26 PM

मुंबई: सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 च्या सुधारित निकालानुसार मुख्य परीक्षेस नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आलीय.   20 ऑक्टोबर 2021 ते दिनांक 26 ऑक्टोबर 2021 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. एमपीएससीकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 15 मार्च 20202 रोजी आयोजित सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 चा निकाल 24 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात आला होता. निकालासंदर्भात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल केलेल्या मूळ अर्ज क्रमांक ७१८/२०२१ प्रकरणी न्यायाधिकरणाच्या 28 सप्टेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार विषयांकित परीक्षेचा सुधारित निकाल दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुधारित निकालानुसार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरीता 20 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून 26 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

26 ऑक्टोबरपर्यंत शुल्क जमा करावं लागणार

आयोगामार्फत 02 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेतील अर्ज सादर करण्याची पद्धत ” मधील तरतुदीनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मुख्य परीक्षेकरीता अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याची कार्यवाही 26 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये दिनांक 27 ऑक्टोबर 2021 पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरणे आवश्यक आहे. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही. उमेदवारांनी अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. विहित कालावधीनंतर अर्ज सादर करण्याकरीता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

राज्य सेवा परीक्षेच्या 390 पदांसाठी जाहिरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली. 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

इतर बातम्या:

MPSC कडून मोठी अपडेट, ऑनलाईन अर्ज प्रणाली अपग्रेड होणार, आयोगाकडून ट्विटद्वारे माहिती

MPSC PSI Physical Test Date | एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर, तब्बल दोन वर्षानंतर मुहूर्त

MPSC appeal to fill Assistant Motor Vehicle inspector Mains exam form after declaration of revised result check details hereॉ

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....