MPSC Group C Admit Card: गट क वर्गासाठीचे परीक्षा प्रवेशपत्र जाहीर ; प्रवेशपत्र थेट ‘या’ लिंकवरुन करा डाऊनलोड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहीर कलेल्या अधिसूचनेनुसार, गट क वर्गातील पदांसाठी 3 एप्रिल रोजी पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी लागणारे प्रवेशपत्र आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) गट क वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी लागणारे प्रेवशपत्र आता जाहीर करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता ते MPSC च्या अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर जाऊन प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करून घेऊ शकतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या सुचनेनुसार, या रिक्त पदांसाठी 2 फेब्रुवारीपर्यंतच अर्ज करू शकणार होते. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार उमेदवारांनी ज्या परीक्षेसाठी (Exam) अर्ज केले आहेत, त्यानुसार प्रवेशपत्र काढता येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या या रिक्त पदांद्वारे (MPSC गट C भरती 2021) एकूण 900 पदांची भरतीची जाहिरा देण्यात आली होती. त्यामुळे परीक्षेआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळोवेळी उमेदवारांच्या माहितीसाठी वेबसाईटवर अधिसूचनाही देण्यात आली होती, ती पाहण्याची सूचना उमेदवारांना करण्यात आली होती.
संपूर्ण महाराष्ट्रा परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या या सुचनेनुसार, या रिक्त पदांसाठी (MPSC गट क भरती 2021) या पदांसाठी अर्ज करण्याची 22 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांनी असे कळविण्या आले आहे की, MPSC गट क ची पूर्व परीक्षा 3 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जाणार आहे.
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षेतील महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख- 22 डिसेंबर 2021
अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती – 11 जानेवारी 2022
पूर्व परीक्षेची तारीख – 3 एप्रिल 2022
मुख्य परीक्षेची तारीख – 6 ऑगस्ट 2022
लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी मुख्य परीक्षा – 13 ऑगस्ट 2022
परीक्षेनंतर निकालाची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे महाराष्ट्र आयोगाकडून सांगण्या आले आहे.
रिक्त जागांचा तपशील
या रिक्त असलेल्या पदांद्वारे उद्योग निरीक्षकासाठी (MPSC Industry Inspector) 103, उपनिरीक्षकासाठी (MPSC Deputy Inspector) 114, तांत्रिक सहाय्यकासाठी (Technical assistant) 14, कर सहाय्यकांसाठी (Tax assistant) 117, लिपिक टंकलेखक मराठी, लिपिक-टंकलेखक, मराठी (Tax Assistant, Clerk-Typist, Marathi) आणि लिपिक-टीटी इंग्रजीच्या 79 पदांवर भरती होणार आहे. (लिपिक-टंकलेखक, इंग्रजी) (Clerk-Typist, English) . या व इतर पदांसाठी रिक्त जागांसाठी काढण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या
MPSC चा धडाका सुरुच, PSI परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, 494 उमेदवारांची यादी प्रसिद्ध
CISF Recruitment 2022 : सीआयएसएफमध्ये खेळाडूंसाठी 249 पदांवर मोठी भरती, 81 हजारांपर्यंत पगाराची संधी