AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Update: सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 20 नोव्हेंबरला, एमपीएससीकडून प्रवेशपत्र आणि मार्गदर्शक सूचना जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 20 नोव्हेंबर 2021 रोजी सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन करण्यात आलं आहे. आयोगानं  मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केली आहेत.

MPSC Update: सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 20 नोव्हेंबरला, एमपीएससीकडून प्रवेशपत्र आणि मार्गदर्शक सूचना जाहीर
MPSC EXAM
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 11:37 AM

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 20 नोव्हेंबर 2021 रोजी सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन करण्यात आलं आहे. आयोगानं  मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केली आहेत. एमपीएससीकडून मुख्य परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठाी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्य परीक्षा देणाऱ्या उमदेवारांनी आयोगानं दिलेल्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे.

प्रवेशपत्रं कुठं मिळणार?

सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चं प्रवेशपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही, असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.

परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचा

परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणा-या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहण्याच्या सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

उशिरा आलेल्या उमेदवारांना प्रवेश मिळणार नाही

परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी निश्चित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.

कोरोना नियमांचं पालन आवश्यक

कोव्हिड 19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे. परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Physical Distancing)संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या नियमांप्रमाणं कारवाई करण्यात येईल.

मुंबईतील उमेदवारांना लोकल प्रवासाला परवानगी

मुंबई महानगर क्षेत्रातील उमेदवारांना परीक्षेच्या दिवशी उपकेंद्रावर पोहोचण्यासाठी लोकल प्रवासास अनुमती देण्यात आली आहे. प्रस्तुत परीक्षेच्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना परीक्षेच्या ठिकाणच्या नजीकच्या रेल्वे स्थानकापर्यंतचे तिकिट प्राप्त करुन घेता येईल.

प्रवेशपत्र मिळण्यास अडचण असल्यास संपर्क साधण्याचं आवाहन

उमेदवारांना प्रवेशपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in आणि support-online@mpsc.gov.in या ईमेल किंवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन कार्यालयीन वेळेत आवश्यक मदत मिळवता येईल.

इतर बातम्या:

VIDEO: राज्यात प्रत्येकजण मुख्यमंत्री, मोदी सरकारमध्ये मात्र कुणालाच मंत्री आहोत असं वाटत नाही, राऊतांचा फडणीसांना टोला

VIDEO: वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा; राऊतांचा कंगनाला टोला

MPSC issue Assistant Motor Vehicle Inspector Main Examination 2020 Admit Card and release instructions for exam

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....