एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अराजपत्रित गट ब विविध संवर्गातील पदांसाठी मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर
22 जानेवारी 2022 ते 12 फेब्रुवारी 2022 दरम्यान गट ब च्या मुख्य परीक्षा होणार असून एमपीएससीने वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. पीएसआय, सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक या पदांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे.
मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. एमपीएससी आयोगानं अराजपत्रित गट ब विविध संवर्गातील पदांसाठी मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एमपीएससीनं तीन महिने आधी मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार 22 जानेवारी 2022 ते 12 फेब्रुवारी 2022 दरम्यान गट ब च्या मुख्य परीक्षा होणार असून एमपीएससीने वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. पीएसआय, सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक या पदांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला झाली होती. (MPSC non-Gazetted Group B announces dates for Main Examination for various categories of posts)
एमपीएससीकडून 2019 च्या PSI परीक्षेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या आणि मुलाखतीच्या तारखा केल्या जाहीर केल्या होत्या. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पीएसआय पदासाठी पहिल्या टप्प्यातील शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे, यांसंदर्भातील तपशीलवार कार्यक्रम आयोगानं जाहीर केला आहे. शारीरिक चाचणीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना मैदानी आणि शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करिता शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कोल्हापूर, नाशिक व पुणे येथील पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमदेवारांची शारिरीक चाचणी पुणे, कोल्हापूर आणि नाशिक इथं घेण्यात येईल.
राज्य सेवा परीक्षा 2021 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज दाखल करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. एमपीएससीकडून अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवार आता राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
2 जानेवारीला होणार एमपीएससीची पूर्वपरीक्षा
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. (MPSC non-Gazetted Group B announces dates for Main Examination for various categories of posts)
MHT CET Result 2021: एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल सांयकाळी 7 वाजता जाहीर होणार, रिझल्ट कुठं पाहायचा?https://t.co/2q78PgAGgY#MHTCET | #MHTCETResult | #Exam | #UdaySamant | @samant_uday
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 27, 2021
इतर बातम्या
Bank of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोद्यात नोकरीची संधी, 15 हजारांपासून पगाराला सुरुवात