AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एस. टी. महामंडळात बंपर भरती, दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, ‘ही’ पदे जाणार भरली, मोठी संधी

MSRTC Recruitment 2024 : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आता नो टेन्शन असणार आहे. नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. खरोखरच ही मोठी संधी आहे.

एस. टी. महामंडळात बंपर भरती, दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, 'ही' पदे जाणार भरली, मोठी संधी
Maharashtra State Road Transport Corporation
Follow us
| Updated on: Jun 03, 2024 | 12:33 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आलीये. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. गेल्या कित्येक दिवसांपासून उमेदवार भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत होते, शेवटी आता ही प्रतिक्षा संपली असून उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. 24 मे 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेतून 256 पदे ही भरली जाणार आहेत. ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे.

मोटार वाहन मेकॅनिक, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटार वाहन बॉडी फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे दहावी पास ते बी. टेकपर्यंतचे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. दहावी पास उमेदवाराकडे आयटीआय किंवा डिप्लोमा संबंधित ट्रेडमध्ये झालेला असावा.

33 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा ही द्यावी लागणार आहे. msrtc.maharashtra.gov.in. या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

सर्वात अगोदर उमेदवारांना परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर मुलाखती होतील आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतर उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 जून 2024 आहे. आपल्याला त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग लगेचच करा अर्ज.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.