NEET UG Result 2021 declared | नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या रिझल्ट कसा पाहावा ?
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विद्यार्थ्यांना https://neet.nta.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
NEET UG Result 2021 नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विद्यार्थ्यांना https://neet.nta.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
एनटीएने देशपातळीवर NEET 2021 परीक्षेचे आयोजन केले होते. लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. कधी एकदा निकाल लागतो असे विद्यार्थांना वाटत होते. शेवटी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. https://neet.nta.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.
NEET 2021 निकाल कसा पाहायचा ?
स्टेप 1 : अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2 : होमपेजवरील निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमचा रोल नंबर, पासवर्ड आणि जन्मतारीख टाका.
स्टेप 4 : स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करा.
स्टेप 5 : तसेच निकालाची प्रिंट आऊट आपल्याकडे ठेवा.
निकालात त्रुटी असल्यास कुठं संपर्क साधायचा?
गेल्या वर्षी, NEET कटऑफ स्कोअर सामान्य श्रेणीसाठी 720-147 होता जो 50 व्या पर्सेंटाइलच्या समकक्ष होता. एससी/एसटी/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी, NEET कटऑफ स्कोअर 146-113 च्या श्रेणीत होता, जो 40 व्या पर्सेंटाईलच्या समकक्ष होता. निकालात काही त्रुटी आढळल्यास, उमेदवार NTA शी ईमेल id- nta@neet.ac.in वर संपर्क साधू शकतात.
इतर बातम्या :
ITI प्रवेशाची मुदत वाढवली, यंदा विद्यार्थ्यांचा वाढता कल, कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांना प्राधान्य
IIM मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, 14 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज