Railway Recruitment 2021: ना परीक्षा ना मुलाखत, थेट दहावीच्या गुणांवर निवड, रेल्वेत अप्रेटिंसची संधी

रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या वतीने अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. अप्रेंटिस जाहीर झालेल्या पदांवर अर्ज करण्याची प्रक्रिया 02 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. अप्रेंटिस साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 1 सप्टेंबर आहे.

Railway Recruitment 2021: ना परीक्षा ना मुलाखत, थेट दहावीच्या गुणांवर निवड, रेल्वेत अप्रेटिंसची संधी
भारतीय रेल्वे
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 11:44 AM

Railway Recruitment 2021 नवी दिल्ली: भारतीय रेल्वेमध्ये फिटर ,वेल्डर, वाईंडर, मशिनिस्ट, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक आणि वायरमन या पदांसाठी अप्रेंटिस करण्याची संधी आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना 1664 पदांवर अप्रेंटिस करता येणार आहे.

अर्ज दाखल करण्याची मुदत?

पात्र उमेदवार 1 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना प्रयागराज, आग्रा, झाशी विभागात अप्रेंटिस करण्याची संधी दिली जाईल. अप्रेंटिस भरती प्रक्रिया आणि इतर अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचणे आवश्यक आहे. पात्र उमेदवार rrcpryj.org या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

अप्रेंटिस पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना रेल्वेत नोकरीत प्राधान्य

रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या वतीने अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. अप्रेंटिस जाहीर झालेल्या पदांवर अर्ज करण्याची प्रक्रिया 02 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. अप्रेंटिस साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 1 सप्टेंबर आहे. रेल्वेतील लेव्हल एकच्या पदांमध्ये भरती प्रक्रियेमध्ये अप्रेंटिस करणाऱ्यांसाठी 20 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार ते 56900 रुपये वेतन दिलं जाईल.

शैक्षणिक पात्रता

रेल्वेतील अप्रेंटिस साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. तर, वेल्डर, वायरमन आणि कार्पेंटर या पदासाठी आठवी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकतात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर, इतर प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी कोणताही शुल्क आकारलं जाणार नाही. गुणवत्ता यादी च्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल, असं कळवण्यात आलंय.

यूपीएससीतर्फे ईएसआयसीमध्ये 151 जागांवर भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ईएसआयसी मधील 151 पदांसाठी भरती पक्रिया जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांकडून ईएसआयसी मधील उपसंचालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. कर्मचारी राज्य बीमा निगम ही संस्था केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत काम करते. या संस्थेत उपसंचालक पदावर भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात आलीय. यूपीएससीतर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील

एकूण151 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून त्यापैकी 66 पदं ही खुल्या प्रवर्गासाठी, 23 पदं अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 9 पदं अनुसूचित जमातीसाठी, 38 पदं ओबीसी प्रवर्गासाठी आर्थिक मागास प्रवर्गासाठी 15 तर 4 पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

इतर बातम्या:

UPSC Recruitment 2021: यूपीएससीतर्फे ESIC मध्ये 151 पदांची भरती, पदवीधरांना मोठी संधी

IOCL Recruitment 2021: इंडियन ऑईलच्या 480 प्रशिक्षणार्थी पदांसाठी रिक्त जागांवर भरती, परीक्षेद्वारे मिळवा नोकरी

Railway Recruitment for Apprentice for 1664 post check details here

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.