AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेरोजगार आहात? ‘हे’ राज्य सरकार देतेय 4500 रुपयांचा भत्ता

देशातील युवकांपुढे सध्या बेरोजगारीचा मुद्दा गंभीर बनला आहे. unemployment allowance to four thousand five hundred

बेरोजगार आहात? 'हे' राज्य सरकार देतेय 4500 रुपयांचा भत्ता
पैसे
| Updated on: Mar 16, 2021 | 4:58 PM
Share

जयपूर: देशातील युवकांपुढे सध्या बेरोजगारीचा मुद्दा गंभीर बनला आहे. भारतात बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलेले आहे. राजस्थान सरकारनं बेरोजगार असणाऱ्या युवकांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री युवा संबल योजनेअंतर्गत राजस्थानमधील बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देण्यात येणार आहे. महिला, दिव्यांक आणि तृतीयपंथी यांना 4500 रुपये, युवकांना 4000 रुपये दिले जाणार आहेत. यापूर्वी युवकांना 3000 हजार तर महिला आणि इतरांना 3500 बेरोजगार भत्ता मिळत होता. (Rajasthan Government increased unemployment allowance to four thousand five hundred rupees)

तुम्ही राजस्थानचे असाल तरच भत्ता मिळणार

राजस्थान सरकारनं ही योजना राजस्थानातील युवकांसाठी सुरु केली आहे. जे व्यक्ती राजस्थानातील असतील त्यांना याचा लाभ घेता येणार आहे. बेरोजगार भत्ता देण्यासाठी सरकारनं काही अटी लागू केल्या आहेत.

योजनेचा लाभ कुणाला मिळणार

बेरोजगार भत्ता मिळण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार राजस्थानचा मूळ निवासी असला पाहिजे. राजस्थानच्या विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावं. राजस्थान बाहेरील विद्यापीठात शिक्षण घेतलेली महिला देखील याचा लाभ घेऊ शकते त्यासाठी तिचा विवाह राजस्थानच्या नागरिकाशी झालेला असावा. अर्जदार खासगी क्षेत्रात कार्यरत असू नये.

किती वर्षापर्यंत भत्ता मिळणार?

बेरोजगार भत्ता मिळवण्यासाठी खुल्या प्रवर्गातील युवकाचं वय 30 तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याचं वय 35 पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. बेरोजगार भत्ता मिळवण्यासाठी प्रथम स्थानिक रोजगार कार्यालयात नोंदणी करणं बंधनकारक आहे.

अर्ज कुठे करायचा?

युवकांनी सर्वप्रथम राजस्थान सरकारच्या Department of Skill, Employment विभागाच्या वेबसाईटवर भेट द्या. त्यानंतर Job Seekers पर्याय निवडा तिथे Apply for Unemployment Allowance त्यावर क्लिक करा. SSO ID, Password, Captcha टाकून लॉगीन करा. त्यानंतर ‘Employment Application’ हा अर्ज भरा. यानंतर तुमचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतला जाईल. त्यानंतर तुम्हाला फोन नंबरवर माहिती मिळत राहिलं.

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टरांना 10 वर्षे सरकारी नोकरी बंधनकारक, सोडल्यास 1 कोटी रुपयांचा दंड

राज्य सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील युक्तीवादावर OBC समाजाचा आक्षेप!

(Rajasthan Government increased unemployment allowance to four thousand five hundred rupees)

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.