‘या’ शाखेत आहात पदवीधर?, मग आजच करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी

पदवीधरांसाठी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. पदवीधर मुलांनी आजच अर्ज करावा. विशेष म्हणजे नुकताच काॅलेजबाहेर पडलेल्या पदवीधरांसाठी ही मोठी बंपर भरती असणार आहे. या भरती प्रक्रियेचे अर्ज करण्याची पद्धत देखील अत्यंत सोपी आहे. मग उशीर कशासाठी लगेचच करा अर्ज.

'या' शाखेत आहात पदवीधर?, मग आजच करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 10:23 AM

मुंबई : व्यवसायापेक्षा नोकरी करण्यावर तरुणांचा भर अधिक आहे. यामुळे क्षेत्र कोणतेही असो तिथे प्रचंड अशी स्पर्धा बघायला मिळते. बऱ्याच वेळा असे असते की एखादा तरुण नोकरीच्या शोधात असतो. मात्र, नेमकी भरती प्रक्रिया कुठे सुरू आहे हेच, त्याला माहिती नसते. परिणामी नोकरी करायची असती, परंतू मिळत नाही. सध्या मोठी बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करून तुम्ही नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न साकार करू शकता. जर तुम्ही वाणिज्य शाखेतून पदवी घेतली असेल तर तुमच्यासाठी खरोखरच ही मोठी संधी असणार आहे. मग उशीर कशाला करत आहात? आजच करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी.

वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. जर तुमच्याकडे वाणिज्य शाखेतील पदवी असेल तर Nationalfertilizers.com च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि आजच अर्ज करा. भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल. 2 नोव्हेंबर 2023 पासूनच ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून अगदी कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे फटाफट अर्ज करा.

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. लेखा सहाय्यकच्या जागांसाठी ही भरती सुरू आहे. जर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. इतके नाही तर तुम्ही 50 टक्के घेऊन पास झालेले असणे देखील अनिवार्य आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. बाकी भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही Nationalfertilizers.com या अधिकृत वेबसाइटवरला भेट देऊ शकता. इथे तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दल सर्व माहिती मिळेलच.

या भरती प्रक्रियेची निवड लेखी परीक्षेनंतर केली जाणार आहे. उमेदवारांची सीबीटी पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. सीबीटी परीक्षेसंदर्भातील माहिती आणि प्रवेशपत्र कंपनीकडून प्रसिद्ध केले जाणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अनुभवाची काहीच अट नाहीये. यामुळे नवीन मुलांसाठी ही संधी असणार आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.