रेल्वे विभागात दहावी पास असणाऱ्यांसाठी बंपर भरती, मुलाखतीमधून केली जाणार थेट निवड
रेल्वे विभागात भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया दहावी पास असणाऱ्यांसाठी आहे. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही थेट या परीक्षेसाठी मुलाखतीसाठी पात्र असाल मग आजच करा अर्ज. या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा ही घेतली जाणार नाहीये.
मुंबई : दहावी पास असणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच असणार आहे. कारण थेट रेल्वे विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. अजिबात उशीर न करताना थेट अर्ज करा आणि मिळवा केंद्र सरकारची नोकरी. ही रेल्वे विभागात निघालेली बंपर भरती आहे. विशेष म्हणजे कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय ही भरती प्रक्रिया पार पडतंय. जर तुम्ही देखील दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर अजिबात उशीर करू नका.
वाराणसी येथे ही भरती प्रक्रिया सुरू आहे. चपरासी पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. या भरती प्रक्रियेसाठी मुलाखत घेतली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 45 असावे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुमच्याकडे मान्यता प्राप्त बोर्डाचे दहावी पासचे प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक असणार आहे.
भरती प्रक्रियेसाठी तुमचे वय किमान 18 आणि 45 पर्यंत असावे. मुलाखतीला जाताना दहावी पासचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, जातीचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लागणार आहे. 4 डिसेंबर रोजी मुलाखती होणार आहेत. सकाळी 11.30 चा मुलाखतीसाठी उमेदवारांना हजर राहवे लागेल. मुलाखतीनंतर पुढील प्रक्रिया ही केली जाईल.
रेल्वे दावा न्यायाधिकरण, रेल्वे स्टेशन जंक्शन, जुनी इमारत पीआरएस बिल्डिंग वाराणसी येथे या भरती प्रक्रियेचा मुलाखती पार पडणार आहेत. उमेदवारांना मुलाखतीसाठी तिथे 11.30 च्या अगोदर पोहचावे लागणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही वेबसाईटला देखील भेट देऊ शकता.
दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी नक्कीच आहे. थेट केंद्र सरकारीची नोकरी करायला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात प्रत्येक अपडेट आपल्याला वेबसाईटवर मिळेल. मग उशीर न करताना लगेचच मुलाखतीसाठी तयारी करा. शेवटचे तीन दिवस या भरती प्रक्रियेसाठी शिल्लक आहेत. पीआरएसच्या जुन्या बिल्डिंगमध्ये या मुलाखती पार पडतील.