AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी उद्यापासून रजिस्ट्रेशन; जाणून घ्या तपशील

उमेदवारांसाठी प्रवेशपत्र 25 सप्टेंबरपासून ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल. जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल.

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी उद्यापासून रजिस्ट्रेशन; जाणून घ्या तपशील
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 4:40 PM

नवी दिल्ली : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयआयटी खरगपूरमध्ये जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी (JEE Advanced 2021) उद्यापासून अर्थात 11 सप्टेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. जेईईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन सुरुवातीच्या अडीच लाखांमध्ये नंबर पटकावणारे उमेदवार या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील. jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल. आयआयटी जेईई परीक्षेसाठी नोंदणी (JEE Advanced 2021 Registration) करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे. नोंदणीकृत उमेदवार 17 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज शुल्क जमा करू शकतील. (Registration for JEE Advance Exam from tomorrow; know the details)

उमेदवारांसाठी प्रवेशपत्र 25 सप्टेंबरपासून ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल. जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट पेपर-1 साठी असेल जी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत चालेल. त्याचबरोबर दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर-2 साठी दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत परीक्षा घेण्यात येईल.

जेईई अ‍ॅडव्हान्सचे वेळापत्रक

– नोंदणी प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 11 सप्टेंबर, 2021 – नोंदणीची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर, 2021 – प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख : 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2021 – जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा : 3 ऑक्टोबर 2021 – जेईई अ‍ॅडव्हान्स 2021 च्या वेबसाइटवर उमेदवारांनी दिलेल्या प्रतिसादांच्या प्रती उपलब्धतेची तारीख – 5 ऑक्टोबर, 2021 – तात्पुरत्या उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन प्रदर्शन – 10 ऑक्टोबर, 2021 – तात्पुरत्या उत्तरपत्रिकांवर अभिप्राय आणि टिप्पण्या देण्याची मुदत : 10 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर, 2021 पर्यंत – आर्किटेक्चर अ‍ॅप्टीट्यूट टेस्ट : 18 ऑक्टोबर 2021 – एएटी निकालांची घोषणा : 22 ऑक्टोबर 2021 – आसन वितरण प्रक्रियेची संभाव्य सुरुवात : 16 ऑक्टोबर 2021

जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी नोंदणी कशी करावी?

विद्यार्थी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सच्या मदतीने परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील.

स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा. स्टेप 2: त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या अर्जाच्या Application Form लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: आता नवीन नोंदणीच्या (New Registration) लिंकवर क्लिक करा. स्टेप 4: यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा. स्टेप 5: आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा, फोटो अपलोड करा आणि स्वाक्षरी करा. स्टेप 6: त्यानंतर अर्ज फी सबमिट करा. स्टेप 7: सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या. (Registration for JEE Advance Exam from tomorrow; know the details)

इतर बातम्या

संतापजनक ! मुंबईत दिल्लीच्या निर्भया हत्याकांडाची पुनरावृत्ती, महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर पीडितेच्या गुप्तांगावर वार

जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे निमित्त साधणार

पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.