AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET 2021 : नीट परीक्षेसाठी दोन टप्प्यांत करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या नवे बदल

इच्छुक आणि पात्र उमेदवार NEET च्या ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी (NEET 2021 Registration) करू शकतात. राष्ट्रीय पात्रतेसह प्रवेश परीक्षा 12 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजित केली जाणार आहे.

NEET 2021 : नीट परीक्षेसाठी दोन टप्प्यांत करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या नवे बदल
नीट परीक्षेसाठी दोन टप्प्यांत करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या नवे बदल
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 9:48 PM

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) यावेळी “NEET 2021”चे अर्ज 2 टप्प्यांमध्ये विभागले आहेत. उमेदवारांचा डाटा लवकरात लवकर जमा करण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हा बदल केला आहे. NEET 2021 च्या नोंदणीसाठी आजपासून सुरुवात झाली आहे. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 6 ऑगस्ट आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार NEET च्या ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी (NEET 2021 Registration) करू शकतात. राष्ट्रीय पात्रतेसह प्रवेश परीक्षा 12 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजित केली जाणार आहे. (Registration in two stages for proper examination; know new changes)

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षांदरम्यान शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे. त्याच अनुषंगाने परीक्षा घेतल्या जाणाऱ्या शहराची संख्या वाढवण्यात आली आहे. यावेळी 155 ऐवजी 198 शहरांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. मागील परीक्षेच्या वेळी 3862 परीक्षा केंद्रे होती. यावेळी या केंद्राची संख्याही वाढवली जाणार आहे.

NEET 2021 : पहिल्या टप्प्यातील अर्ज

एनटीएने सांगितले आहे की, उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज जमा करण्याच्या अंतिम तारखेआधी माहितीचा पहिला सेट भरणे आवश्यक आहे. पहिल्या सेटमध्ये उमेदवारांची वैयक्तिक माहिती, कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती, स्वाक्षरी, अंगठ्याचे निशाण आणि संबंधित माहिती देणे गरजेचे आहे.

NEET 2021 : दुसर्‍या टप्प्यातील अर्ज

निकालाची घोषणा किंवा स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यापूर्वी उमेदवारांनी माहितीचा दुसरा सेट भरणे आवश्यक आहे. दुसर्‍या सेटमध्ये उमेदवारांना पहिल्या सेटमध्ये दिलेल्या माहितीचा सविस्तर तपशील द्यावा लागेल. आई-वडिलांच्या उत्पन्नाचा तपशील, निवासस्थान, शैक्षणिक तपशील आदींची माहिती NEET 2021 च्या अर्जाच्या दुसर्‍या सेटमध्ये भरावी लागेल.

उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्सचे पालन करीत अर्ज भरू शकतात.

स्टेप 1: विद्यार्थ्यांनी ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे. स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या नोंदणीच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: त्यावर क्लिक करताच नवीन नोंदणीच्या पर्यायावर जा. तेथे तुमचा मोबाइल नंबर किंवा ईमेलच्या मदतीने रजिस्ट्रेशन करा. स्टेप 4: आता तुम्हाला मेसेजवर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. स्टेप 5: आता त्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या आधारे लॉग इन करा. स्टेप 6: मागणी केलेली सर्व माहिती सबमिट करा. स्टेप 7: तुमचा फोटो आणि सही अपलोड करा. स्टेप 8: अर्जाचे शुल्क जमा करा. स्टेप 9: सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या अर्जाची प्रिंट घ्या. (Registration in two stages for proper examination; know new changes)

इतर बातम्या

स्वामित्व योजनेसंदर्भात सरकार अॅक्शन मोडमध्ये, फायदा कोणाला अन् कसा होणार?

आदित्य ठाकरेंकडून महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर, वाचा 5 महत्त्वाची वैशिष्ट्ये

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.