देशात नोकऱ्यांची बोंबाबोंब… प्रत्येक 100 लोकांमध्ये 88 लोक नोकरीच्या शोधात; अहवालात मोठा खुलासा
नुकताच एका अहवालामध्ये मोठा खुलासा करण्यात आलाय. ज्यानंतर सर्वजण हे हैराण झाले आहेत. अहवालात धक्कादायक आणि हैराण करणारी माहिती ही पुढे आलीये. जवळपास 100 पैकी 88 लोक हे नोकरीच्या शोधात आहेत. म्हणजेच काय तर जवळपास लोक हे नोकरीच्या शोधात आहेत.
मुंबई : बऱ्याच वेळा असे होते की, आपल्याला नोकरी लागते. मात्र, हवे ते काम कधीच मिळत नाही. मग अशावेळी आपण सतत नोकरीच्या शोधात असतो. प्रत्येकाला आपल्या आवडीची नोकरी हवीयं. सध्या जगामध्ये नोकऱ्यांची नेमकी स्थिती काय आहे हे जवळपास सर्वांनाच माहितीये. सतत लोक नोकऱ्यांच्या शोधात आहेत. नुकताच एका रिपोर्टमध्ये नोकऱ्यांबद्दल एक अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारी माहितीही पुढे आलीये. 100 पैकी 88 लोक हे आपल्या सध्याच्या नोकरीमध्ये खुश नसल्याचे अहवालात सांगण्यात आलंय.
विशेष म्हणजे 100 पैकी 88 लोक हे नवीन वर्षात नवीन नोकरीच्या शोधात देखील आहेत. या 88 पैकी 18 ते 24 वयोगटातील लोकांचा समावेश आहे. ऑनलाइन जॉब सर्चिंग पोर्टल लिंक्डइनच्या अहवालानुसार 100 पैकी 88 लोक हे नवीन नोकरीच्या शोधात आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असण्याची कारणेही जवळपास सर्वांची वेगवेगळी आहेत.
30 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 दरम्यान 18 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या एकून 2 हजारांहून अधिक कर्मचार्यांवर केलेल्या संशोधनातून हे समोर आले. 88 टक्के तरुणांना नोकरी बदलायची आहे. हेच नाही तर 45 ते 54 वयोगटातील 64 टक्के लोक देखील नोकरी बदलू इच्छित आहेत, हे देखील अत्यंत विशेष आहे.
वाढलेली महागाई आणि कमी पगार असल्याने जवळपास लोक हे नवीन नोकरीच्या शोधात असल्याचे अहवालात सांगण्यात आलंय. 33 टक्के लोकांना अशी कंपनी पाहिजे, जिथे कामासोबतच आपल्या कुटुंबियांना देखील वेळ देता येईल. म्हणजेच काय तर प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ बॅलेन्स करता येईल.
35 टक्के लोकांना अधिक पगार हवा असल्याने ते नोकरीच्या शोधात आहेत. 32 टक्के लोकांना त्यांच्या कामावर विश्वास आहे आणि त्यांना वाटते की, सध्याच्या कंपनीपेक्षा आपल्याला दुसरीकडे चांगले काम करायला मिळेल. त्यामुळे हे लोक देखील नोकरीच्या शोधात आहेत. म्हणजेच काय तर जवळपास सर्वच लोक हे नोकरीच्या शोधात आहेत.