SBI Clerk Recruitment : स्टेट बँकेत 5 हजार जागांवर भरती, 49 हजारांपर्यंत पगार, अर्ज करण्याची शेवटची संधी चुकवू नका
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदासाठी अर्ज करण्यासाठी अखेरची संधी आहे. SBI Clerk Recruitment
SBI Clerk Recruitment 2021: नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदासाठी अर्ज करण्याची आज अखेरची संधी आहे. स्टेट बँकेत तब्बल 5 हजार पदांसाठी भरती होणार आहे. बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी स्टेट बँकेने 17 मे हा दिनांक निश्चित केला होता. मात्र, कोरोना संसर्गा आणि उमेदवारांचा प्रतिसाद पाहता अर्ज करण्याची मुदत 20 मे पर्यंत वाढवण्यात आली होती. ( SBI Clerk Recruitment 2021 last date to application for five thousand vacancies junior associates visit sbi co in for details)
अर्ज कुठे करायचा?
स्टेट बँकेच्या क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) पदासाठी उमेदवारांनी स्टेट बँकेच्या वेबसाईटला भेट द्यावी. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी sbi.co.in, bank.sbi/careers या वेबसाईटवर अर्ज भरावा.
पात्रता:
ज्युनिअर असोसिएटस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार भारत सरकार आणि राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं वय 20 वर्ष ते 28 वर्षांदरम्यान असणं गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया:
ज्युनिअर असोसिएटस पदावर उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं पूर्व आणि मुख्य परीक्षा घेण्यात येईल. अर्ज करताना उमेदवार जी प्रादेशिक भाषा निवडतील त्या भाषेमध्ये परीक्षेचे आयोजन केले जाईल. पूर्व परीक्षा 1 तासाची असेल. यामध्ये इंग्रजी भाषा, तार्किक क्षमता, गणितीय क्षमता यासंबंधी 100 प्रश्न असतील. ही परीक्षा 100 गुणांसाठी होईल आणि 0.25 गुण चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातील. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल.
परीक्षा फी
ज्युनिअर असोसिएटस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 750 रुपये फी भरावी लागेल. तर, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.
पगार
स्टेट बँकेच्या ज्युनिअर असोसिएटस पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 17 हजार 900 ते 47 हजार 920 पगार मिळेल.
अर्ज कुठे करणार ?
उमेदवारांनी एसबीआयने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज सादर करावा. जे अर्ज करणार आहेत ते sbi.co.in/careers वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
सेबीचा एका फार्मा कंपनीला दणका, तब्बल 14 लाखांचा दंड ठोठावलाhttps://t.co/GR88GgoltH#SEBI | #PharmaCompany | #BusinessNews | #Biocon
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2021
संबंधित बातम्या:
Bank Job 2021: स्टेट बँकेत ‘या’ पदासाठी भरती, 47920 रुपयांपर्यंत पगार मिळणार
SBI clerk job notification 2021: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर बंपर भरती, 49 हजारांपर्यंत पगार
( SBI Clerk Recruitment 2021 last date to application for five thousand vacancies junior associates visit sbi co in for details)