SBI PO Prelims Result 2021 : स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI)एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षेचा (SBI PO) निकाल जाहीर केला आहे.

SBI PO Prelims Result 2021 : स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 9:02 AM

नवी दिल्ली: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI)एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षेचा (SBI PO) निकाल जाहीर केला आहे. एसबीआयनं निकाल त्यांच्या वेबसाईटवर (SBI PO Prelims Result 2021)चा निकाल जाहीर केला आहे. एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षेचा निकाल उमेदवारांना स्टेट बँकेची अधिकृत वेबसाईट sbi.co.in/careers वर पाहता येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 20, 21 आणि 27 नोव्हेंबरला प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 2056 जागांवर भरती केली जाणार आहे.

मुख्य परीक्षेचाी तारीख लवकरच जाहीर होणार

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 20, 21 आणि 27 नोव्हेंबरला प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. देशातील विविध परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेत क्वालिफाय झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसर्स मुख्य परीक्षेची अ‌ॅडमिट कार्ड येत्या काही दिवसांमध्ये स्टेट बँकेच्या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. मुख्य परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेचा निकाल कसा पाहणार?

स्टेप 1: उमेदवारांना प्रथम sbi.co.in/careers या वेबासाईटवर जावं लागेल स्टेप 2: होमपेजवर एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षा निकाल अशी लिंक असेल त्यावर क्लिक करा स्टेप 3: यानंतर नवीन विंडो ओपन होईल स्टेप 4: नव्या विंडोमध्ये नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकल्यानंतर निकाल उपलब्ध होईल.

स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर्स पूर्व परीक्षेची गुणवत्ता यादी प्रवर्गानुसार जाहीर केली जाते. जेवढ्या पदांची भर्ती करायची आहे त्याच्या दहापट उमेदवारांना मुख्य परीक्षेला संधी दिली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियानं प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 2056 जागांवर भरती केली जाणार आहे.

प्रोबेशनरी ऑफिसर पदाची पात्रता काय असते?

भारतीय स्टेट बँकेतील प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण झालेली कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक असतं.

इतर बातम्या:

MPSC Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरातींचा धडाका सुरुच; जीवरसयानशास्त्रज्ञ पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर

MPSC Update: औषध निरीक्षक पदासाठीच्या भरतीची प्रक्रिया स्थगित, आयोगाकडून महत्त्वाची माहिती

SBI PO Prelims Result 2021 declared at sbi co in how will you check know this

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....