SBI PO Recruitment 2023 : एसबीआयमध्ये प्रोबेशनरी ऑफीसर पदाची भरती, असा करा अर्ज
स्टेट बॅंक ऑफ इंडीयामध्ये नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युशन पूर्ण केलेल्यांसाठी प्रोबेशनरी ऑफीसर म्हणून नोकरी करण्याची चांगली संधी चालून आली आहे.
नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : बॅंकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने प्रोबेशनरी ऑफीसर ( PO ) भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केले आहे. या प्रोबेशनरी ऑफीसर पदासाठी अर्ज दाखल करण्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 7 सप्टेंबर 2023 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करु शकणार आहेत. एसबीआयची अधिकृत वेबसाईट bank.sbi वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2023 अशी आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बॅंकेत नोकरी करण्याची तयारी असल्यास स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने ( SBI ) प्रोबेशनरी ऑफिसरी ( PO ) पदांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केले आहे. एकूण 2000 पदासाठी भरती निघाली आहे. खालील वर्गवारीसाठी ही भरती घेण्यात येत आहे.
अशी आहे पदाची वर्गवारी
जनरल – 810 पदे
ओबीसी – 540 पदे
ईडब्ल्युएस – 240 पदे
एससी – 300 पदे
एसटी – 150 पदे
पात्रता नेमकी काय आहे ?
या भरतीत सहभाग घेण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएशनची पदवी घेतलेली हवी. त्याशिवाय जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्ष किंवा अंतिम सेमिस्टरचा अभ्यास करीत आहेत ते देखील अर्ज करु शकणार आहेत. उमेदवाराचे वय 21 पेक्षा जास्त आणि 30 पेक्षा जादा नसावे. वयाची मोजणी 1 एप्रिल 2023 तारखेला आधारभूत मानून करण्यात यावी. कमाल वयातील सूट नियमानूसार दिली जाईल.
अशी होणार निवड
या भरतीत उमेदवारांची निवड सर्वात आधी प्रीलीयम परीक्षामध्ये सहभाग घेऊन ती उत्तीर्ण व्हावी लागेल. यात उत्तीर्ण झालेल्यांना मुख्य परीक्षेला बोलावले जाईल. मुख्य परीक्षेत निर्धारीत कटऑफ गुण प्राप्त केलेल्यांना मुलाखतीला बोलावले जाईल.