भारतीय स्टेट बॅंकेत सहा हजाराहून अधिक पदांची भरती, ग्रॅज्युएट तरुणांना चांगली संधी

तुम्ही पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. एसबीआय बॅंकेत सहा हजार पदासाठी भरती सुरु झाली आहे.

भारतीय स्टेट बॅंकेत सहा हजाराहून अधिक पदांची भरती, ग्रॅज्युएट तरुणांना चांगली संधी
SBI-BankImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 1:42 PM

नवी दिल्ली | 4 सप्टेंबर 2023 : बॅंकेत नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबरी आहे. ज्यांना नोकरी करायची असेल तर भारतीय स्टेट बॅंकेत ( SBI ) नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत देशभरात सहा हजाराहून अधिक अप्रेंटिसच्या भरतीचे नोटीफिकेशन जारी केले आहे. यासंदर्भात ऑनलाईन अर्ज करण्याची प्रतिक्रीया सुरु झाली आहे. उमेदवार बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 21 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. तर पाहा काय आहे प्रक्रीया …

एसबीआय अप्रेंटिस भरती 2023 नोटीफिकेशननूसार ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. उमेदवारांना 21 सप्टेंबरपर्यंत किंवा त्याच्या आधीच अर्ज करु शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल. या भरतीद्वारे देशभरात बॅंकात एकूण 6160 रिक्त जागा भरल्या जातील. उमेदवार आधिकारिक वेबसाइट्स nsdcindia.org/apprenticeship या apprenticeshipindia.org किंवा bfsissc.com किंवा Bank.sbi/careers किंवा www.sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतील.

एसबीआय अप्रेंटिस नोटीफिकेशनची तारीख : 31 ऑगस्ट 2023

एसबीआय अप्रेंटिस अर्जाची सुरुवात: 01 सप्टेंबर 2023

एसबीआय अप्रेंटिस अर्जाची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2023

एसबीआय अप्रेंटिस परीक्षेची तारीख : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

कोण आहे पात्र पाहा

एसबीआय अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा संस्थेतून ग्रॅज्युएट करायला हवे. तसेच उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2023 रोजी किमान 20 तर कमाल 28 वर्ष असणे गरजेचे आहे. आरक्षित वर्गाला वयाची सुट दिली जाईल. अधिक माहितीसाठी नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

निवड प्रक्रीया काय आहे

एसबीआय अप्रेंटिस भरती 2023 ची निवड प्रक्रीया गेल्या भरती मोहीमेसारखीच आहे. उमेदवार लेखी परीक्षा आणि स्थानिय भाषेत परिक्षा पास करुनच नोकरी मिळण्यास प्राप्त ठरतील. ऑनलाईन परीक्षा ऑक्टोबर / नोव्हेंबर मध्ये आयोजित केल्या जातील. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर उमेदवाराला मेडीकल टेस्टसाठी हजर व्हावे लागेल.

'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.