Rozgar Mela Today : तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले इतक्या जणांना नियुक्ती पत्र
Rozgar Mela Today : सरकारी नोकरीची क्रेझ आजही कायम आहे. देशातील विविध राज्यातील अनेक तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.
नवी दिल्ली : सरकारी नोकरीची (Government Jobs) क्रेझ आजही कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने आणि स्थानिक पातळीवरील भरती आयोगातील घोटाळ्यांमुळे अनेक तरुणांनी रोष व्यक्त केला होता. केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक पाऊल टाकले. देशातील विविध राज्यातील अनेक तरुणांच्या सरकारी नोकरीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. त्यासाठी देशभरात रोजगार मेळाव्याचे आयोजन (Rozgar Mela)करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तरुणांना नियुक्ती पत्र दिले.
इतक्या तरुणांच्या हाताला रोजगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले. सरकारच्या विविध विभागात या नोकऱ्या देण्यात आल्या. मंगळवारी, 13 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे जवळपास 70,000 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले.
देशात 43 ठिकाणी रोजगार मेळावा देशात आज एकाचवेळी 43 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होते. रोजगार मेळावा हे केंद्र सरकारचं महत्वपूर्ण पाऊल आहे. या माध्यमातून तरुणांना त्वरीत आणि कोणत्याही चिंतेशिवाय तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात येते. केंद्र सरकारला आशा आहे की, हे मेळावे रोजगार देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावतील. तसेच यामध्यमातून देशाचा सर्वांगिण विकास करण्यात तरुणांचा मोठा हातभार लागेल.
कोण कोणत्या विभागात नोकरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील अनेक विभागात या रोजगार मिळाव्याच्या माध्यमातून नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं. वित्तीय सेवा, टपाल खाते, शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण विभाग, महसूल विबाग, समाज कल्याण, अणू ऊर्जा विभाग, रेल्वे विभाग, लेखा परीक्षा आणि लेखा विभाग, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय विभागात कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
रोजगाराचा दावा काय रोजगार मेळाव्या अंतर्गत आतापर्यंत 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. या सर्व तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर SSC, UPSC आणि Railway अंतर्गत आतापर्यंत 8 लाख 82 हजार तरुणांना नोकरी देण्यात आली आहे.
आज 70 हजार तरुणांना नियुक्ती पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 70 हजार 126 तरुणांना नियुक्ती पत्र दिले. अनेक राज्यांमध्ये रोजगार मेळाव्यातंर्गत नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. रोजगार मेळावा या सरकारचे ओळख झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
मोठ-मोठ्या कंपन्या भारतात जागतिक मंदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था गतिमान आहे. भारतीय अर्थव्यवस्था अग्रेसर आहे. देशात मोठ-मोठ्या कंपन्या येत आहेत. येत्या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.