AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Apprentice परीक्षेला स्थगिती, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून नव्या तारखांची लवकरच घोषणा

स्टेट बँक ऑफ इंडियानं नोव्हेंबर 2020 मध्ये 8500 अप्रेंटिस पदांसाठी जाहिरात दिली होती. SBI Apprentice Online Exam Postponed

SBI Apprentice परीक्षेला स्थगिती, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून नव्या तारखांची लवकरच घोषणा
स्टेट बँक ऑफ इंडिया
| Updated on: Mar 05, 2021 | 4:27 PM
Share

SBI Apprentice Online Exam Postponed नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (State Bank Of India) अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठीची ऑनलाईन परीक्षा स्थगित केली आहे. ज्या उमेदवारांनी SBI अप्रेंटिस भरती परीक्षेसाठी अर्ज केले असतील त्यांनी अधिक माहितीसाठी एसबीआयच्या वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 8500 पदांसाठी होणारी परीक्षा आता एप्रिल महिन्यात घेण्यात येईल.  (State Bank of India postponed Apprentice online exam till April 2021)

एप्रिल महिन्यात परीक्षा

सेंट्रल रिक्रूटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट, स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या वेबसाईटवर एक नोटीस जारी केली आहे. त्यानुसार जानेवारी 2021 मध्ये आयोजित होणारी परीक्षा एप्रिल महिन्यात होईल.ऑनलाईन परीक्षेच्या नवीन तारखा खाली दिलेल्या वेबसाईटवर जाहीर होती. अर्ज केलेल्या उमेदावारंनी वेबसाईटवर भेट द्यावी, अशी माहिती देण्यात आली आहे.

https://bank.sbi/careers https://nsdcindia.org/apprenticeship https://apprenticeshipindia.org http://bfsissc.com

स्टेट बँक ऑफ इंडियानं नोव्हेंबर 2020 मध्ये 8500 अप्रेंटिस पदांसाठी जाहिरात दिली होती. यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरुन घेण्यात आले होते. 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये अर्ज भरुन घेण्यात आले होते.

पहिल्या वर्षी 15 हजार रुपये विद्यावेतन

अप्रेंटिस पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषेतील प्राविण्यता या आधारांवर निवड केली जाणार होती. जानेवारी महिन्यात होणारी ही परीक्षा आता एप्रिल महिन्यात होणार आहे. ज्या उमेदवारांची निवड अप्रेंटिस पदासाठी होईल त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया पहिल्या वर्षी 15000 तर दुसऱ्या वर्षी 16500 रुपये दरमहा वेतन देईल.

संबंधित बातम्या:

JEE Main 2021: परीक्षेसाठी नोंदणीची उद्या अंतिम तारीख, लवकर करा अर्ज

SSC HSC Exams 2021 : वर्षा गायकवाडांनी ठासून सांगितलं, काठिण्य पातळी गौण, आमची तयारी झालीय!

पवईच्या आयआयटीची जगात उत्तुंग भरारी ; सर्वोत्कृष्ट 50 विद्यापीठांमध्ये मिळवले स्थान

(State Bank of India postponed Apprentice online exam till April 2021)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.