तरुणीने सतरंजीएवढ्या जागेत व्यवसाय सुरु केला, आता कोट्यवधी कमावते!
जपना ऋषी (Japna Rishi Kaushik) या तरुणीने हरियाणात एका छोट्या जागी आपला व्यवसाय सुरु केला होता. छोटी जागा म्हणजे केवळ 6 बाय 4 ची खोलीच.
चंदीगड : “कोई भी धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता” हा शाहरुख खानच्या रईस सिनेमातील डायलॉग हरियाणाच्या जपना ऋषीने प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिलं आहे. सतरंजी एवढ्या जागेत सुरु केलेला व्यवसाय आता तीन कोटीपर्यंतची उलाढाल करत आहे. कोणताही व्यवसाय अर्थात बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे पैसा, भांडवल किंवा मोठी जमीन हवी असं म्हटलं जातं. मात्र हरियाणाच्या जपना ऋषी कौशिक (Japna Rishi Kaushik) या तरुणीने हे सर्व खोटं ठरवलं आहे. तुमच्याकडे जर चांगली आयडिया असेल, तर तुम्ही तगडा पैसा कमवू शकता, हे जपनाने दाखवून दिलं आहे. भलेही तुमच्याकडे पैसा कमी असो, जर तुमच्या आयडियाला रणनीतीची जोड दिली, तर यश तुमचंच. (success story of Japna Rishi Kaushik entrepreneur who sells nutritious )
जपना ऋषी या तरुणीने हरियाणात एका छोट्या जागी आपला व्यवसाय सुरु केला होता. छोटी जागा म्हणजे केवळ 6 बाय 4 ची खोलीच. ज्यामध्ये माणूस राहूही शकत नाही, अशी अर्धी खोली. एखादी सतरंजी बसेल एवढ्याच जागेत जपनाने आपला व्यवसाय सुरु केला. या व्यवसायाला जपनाने मेहनतीची जोड दिली. बघता बघता या उद्योगाचा टर्नओव्हर कोट्यवधीपर्यंत पोहोचला.
कोण आहे जपना ऋषी कौशिक?
जपना ऋषी कौशिक ही पटियालाजवळची रहिवाशी. जपनाने पटियालामध्ये पंजाब विद्यापीठातून फूट टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने नोकरी सुरु केली. नोकरीच्या निमित्ताने जपनाने कोका कोला, नेस्ले यासारख्या मोठ्या कंपन्यांसोबत काम केलं. त्यानंतर तिने 2016 मध्ये कुपोषणाबाबत कुठेतरी वाचलं. भारतातील कुपोषणाचं भीषण वास्तव तिला नव्याने समजलं.
जपनाचा नेमका व्यवसाय काय?
जपनाने पती विवेक कौशिक यांच्यासोबत 2016 मध्ये हंग्री फॉएल नावाची कंपनी सुरु केली. त्यानंतर त्यांनी 5 रुपय आणि 10 रुपयात विकले जाणारे छोटे केक/मफिन, चोको एनर्जी यासारख्या छोटे बेकरी प्रोडक्ट विकण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी गरिबांपर्यंत पोषक पदार्थ पोहोचवण्यासाठी अर्थात सुका मेवा काम सुरु केलं. त्यांनी Nut Lite सुरु केलं. ज्यामध्ये सुका मेवा जसे काजू, बदाम यांचा समावेश आहे. त्यांची किंमत कमी ठेवली.
त्यांचे हे प्रोडक्ट आता दिल्ली, NCR, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेशांसह विविध राज्यातील मोठ्या शहरात पोहोचले आहेत. अत्यंत स्वस्त दरात आरोग्यदायी सुका मेवा तो ही खात्रीशीर मिळत असल्याने, ग्राहकांची त्याला पसंती मिळत आहे. अन्य कंपन्याही सुका मेवा देत आहेत. मात्र त्याची किंमत किमान 50 पासून सुरु होते, तर जपना आणि विवेक ते 10 रुपयांपासून देत आहेत. त्यांनी हळूहळू आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवली. त्यांना आता चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तीन कोटीपर्यंत टर्नओव्हर
जपना आणि विवेक यांच्या या छोट्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता त्यांची वार्षिक उलाढाल तब्बल तीन कोटीपर्यंत पोहोचली आहे. लो कॉस्ट प्रोडोक्शन अर्थात कमीत कमी खर्चामुळे ते व्यवसायात वैविध्य आणत आहेत. किमान नफा आणि जास्त विक्री या तत्त्वावर दोघे काम करत आहेत.
संबंधित बातम्या
Railway Jobs : 10वी पाससाठी तरुणांसाठी मोठी संधी, कुठल्याही परीक्षेविना मिळवा नोकरी