ऐतिहासिक क्षण! दोघा ट्रान्सजेंडर डॉक्टरांना मिळाली सरकारी नोकरी, कोणत्या राज्यात? वाचा

वैद्यकीय अधिकारी दर्जाचं पद दोघा ट्रान्सजेंडर डॉक्टरांना देण्यात आलं आहे! असं पहिल्यांदाच घडतंय...

ऐतिहासिक क्षण! दोघा ट्रान्सजेंडर डॉक्टरांना मिळाली सरकारी नोकरी, कोणत्या राज्यात? वाचा
ट्रान्सजेंडर डॉक्टरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 2:25 PM

तेलंगणामध्ये एक ऐतिहासिक गोष्ट घडली. तेलंगणात डॉक्टर असलेल्या दोघा ट्रान्सजेंडरची वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलीय. सरकारच्या वैद्यकीय विभागात ट्रान्सजेंडरची करण्यात आलेली अशा प्रकारची ही पहिलीच नेमणूक आहे. त्यामुळे या नेमणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या नेमणुकीमुळे ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ही एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद नेमणूक आहे, असं मत अनेकांनी नोंदवलं आहे. वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या ट्रान्सजेंडर डॉक्टरची नावं प्राची राठोड आणि रुथ जॉन अशी आहे. त्यांची डॉक्टर म्हणून असलेली कामगिरी पाहून त्यांना ही जबाबदारी देण्यात आलीय.

आपल्या वैद्यकीय सेवेत दाखवलेली मेहनतच त्यांना आज या यशापर्यंत घेऊन आलीय. उशिरा का होईल, ट्रान्सजेंडर कम्युनिटीला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबाबतही दोन्ही डॉक्टरांना समाधान व्यक्त केलंय.

डॉ रुथ जॉन खम्मम जिल्ह्यातील आहेत. हा माझ्यासाठी सन्मानाचा आणि मोठा दिवस आहे, असं त्यांनी आपली नेमणूक झाल्यानंतर म्हटलंय. इतकी मोठी जबाबदारी सांभण्याची संधी मिळेल, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती, असंही त्यांनी म्हटलं.

डॉ. रुथ यांनी 2018 साली डॉक्टरची पदवी घेतली. त्यानंतर त्यांना जवळपास 15 रुग्णालयांमधून नकार झेलावा लागला होता. हैदराबादमध्ये त्यांना कुणीच काम करण्याची संधी देत नव्हतं. आपल्या शरीराची ओळख आपल्याला काम नाकारते आहे, असं त्यांना कुणी स्पष्टपणे म्हटलं नाही. पण नकार मिळण्याचं दुसरं काय कारण असणार? याची कल्पना मला होती, असंही रुथ यांनी म्हटलंय.

एमबीबीएस केल्यानंतर माझी ओळख जगासमोर जेव्हा ट्रान्सजेंडर म्हणून झाली, तेव्हा माझं वैद्यकीय शिक्षण त्यासमोर ढेंगण कसं काय पडू शकतं? असा प्रश्नही त्यांना पडला होता. डॉ. रुथ जॉन यांनी हैदराबाद येथील मल्ला रेड्डी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलंय.

डॉक्टर प्राची राठोड यांच्यासोबतही काहीसा असाच किस्सा घडला होता. त्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांची लिंगबदलाची प्रक्रिया सुरु होती. 30 वर्षीय डॉक्टरच्या लिंग बदलाबाबत जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलच्या प्रशासनाला कळलं तेव्हा सगळेच बिथरले. एक दिवस डॉ. प्राची यांना काम सोडून जाण्यास सांगण्यात आलं.

तुम्ही आमच्याकडे काम करत राहिलात, तर रुग्ण उपचारासाठी आमच्याकडे येणारच नाही, अशी भीती त्या खासगी रुग्णालयाता सतावत होती, असं डॉ. प्राची यांनी म्हटलंय. डॉ. प्राची यांनी अदिलाबात येथील आरआयएमएस मधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलंय.

दरम्यान, कुठेच काम करण्याची संधी मिळत नाही, हे पाहून दोन्ही डॉक्टरांनी यूएसआयएडी येथील ट्रान्सजेंडर क्लिनिक मित्र इथं काम करण्यात सुरुवात केली. नारायणगुडा इथं असलेल्या क्लिनिक मित्रच्या माध्यमातून त्यांनी आपल्या करिअरचा सुरुवात केली. हा काळ दोघांसाठीही कठीण होता. दोघंही सर्जरी प्रोसेसमधून जात होते.

आजही अनेक रुग्ण ट्रान्सजेंडर डॉक्टर आहे हे कळल्यावर काहीचे धास्तावतात, असं डॉ. रुथ यांनी म्हटलंय. पण उपचारानंतर बरं वाटलं की ते नॉर्मल वागतात, असंही ते म्हणतात. आता वैद्यकीय अधिकारी म्हणून संधी मिळाली, असली, तरी अजूनही एक मोठी लढाई लढणं अजूनही बाकी आहे, असंही डॉ. रुथ यांनी म्हटलंय. ही फक्त सुरुवात आहे, अजून बराच मोठा पल्ला आमच्या समुदायाला गाठावा लागणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.