AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agneepath Scheme: अग्निवीरांची भरती संख्या भविष्यात 1.25 लाखांपर्यंत जाणार, योजनेवर संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद

निवृत्तीनंतर काय करणार हे त्यांना विचारण्याचा कधी कुणी प्रयत्न केला नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत या योजनेशी संबंधित जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आयएएफने आपल्या प्लॅन नोटमध्ये अग्निपथला सशस्त्र दलांसाठी एक नवीन मानव संसाधन व्यवस्थापन योजना म्ह्णून वर्णन केलं आहे.

Agneepath Scheme: अग्निवीरांची भरती संख्या भविष्यात 1.25 लाखांपर्यंत जाणार, योजनेवर संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद
Agneepath YojanaImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 4:16 PM

नवी दिल्ली: अग्निपथ योजने (Agneepath Scheme) वरून देशात सुरु असलेल्या आंदोलनामध्ये आज रविवारी तिन्ही सेना मिळून एक पत्रकार परिषद (Press Conference Related To Agneepath Scheme) घेत आहेत. या दरम्यान युवकांनी उत्कटतेने आपले भान ठेवणे गरजेचं असल्याचं सेनेने म्हटले आहे. लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अरुण पुरी म्हणाले,’तीन सेवांमधून (अग्निपथ योजनेअंतर्गत भरती) दरवर्षी सुमारे 17,600 लोक मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेत आहेत. निवृत्तीनंतर काय करणार हे त्यांना विचारण्याचा कधी कुणी प्रयत्न केला नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत या योजनेशी संबंधित जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आयएएफने (IAF) आपल्या प्लॅन नोटमध्ये अग्निपथला सशस्त्र दलांसाठी एक नवीन मानव संसाधन व्यवस्थापन योजना म्ह्णून वर्णन केलं आहे. त्यात त्यांनी असंही म्हटलं आहे की सैन्यात भरती झालेल्या उमेदवारांना हवाई दल कायदा 1950 द्वारे नियंत्रित केले जाईल.

 कार्यमुक्त करण्याची विनंती मान्य केली जाणार नाही

सेवा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी अग्निवीरांनी स्वतःला कार्यमुक्त करण्याची केलेली विनंती मान्य केली जाणार नाही आणि केवळ अपवादात्मक प्रकारणांमध्येच परवानगी दिली जाईल आणि सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरच ती पूर्ण होईल, असं त्यात म्हटलंय. हवाई दलाच्या २९ कलमी नोटमध्ये नव्या योजनेविषयी विविध माहिती देण्यात आलीये. त्यात पात्रतेचे निकष, मोबदल्याची पॅकेज, वैद्यकीय आणि सीएसडी (कँटीन स्टोअर विभाग) सुविधा, अपंगत्त्वाची भरपाई, अपंगत्त्वाच्या उंबरठ्याची मोजणी, रजा आणि प्रशिक्षण यांचा समावेश आहे. आता तिन्ही सैन्यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया…

हे सुद्धा वाचा

 लष्करच्या वतीने लेफ्टनंट जनरल अरुण पुरी,

  • सेवाशर्तींमध्ये अग्निवीरांबाबत भेदभाव केला जाणार नाही
  • देशसेवेत बलिदान देणाऱ्या अग्निवीरांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार
  • अग्निवीरला सियाचीनसारख्या भागात आणि सध्या नियमित सैनिकांना लागू असलेल्या इतर भागातही तेवढाच भत्ता आणि सुविधा मिळणार आहेत.
  • फिटनेस घेतली जाणार, ट्रेनिंग घेतली जाणार, बारावीचं सर्टिफिकेट दिलं जाईल
  • 60-70 टक्के तरुण दहावी पास असतील
  • देशभक्तीच्या भावनेला पैशाने तोलू नका
  • अग्निवीरांना मिळणारे 11 लाख रुपये प्राप्तिकरमुक्त असतील
  • येत्या चार वर्षात 50-60 टक्के भरती होणार आहे.
  • 1989 पासून लष्करात सुधारणांची मागणी होत आहे.
  • पुढील लढाईचे आव्हान तंत्रज्ञानाचे असेल.
  • सरासरी वय कमी झाल्यास लष्करातील जवानांची संख्या वाढणार आहे.
  • अग्निवीरांबाबत विविध मंत्रालये आणि विभागांची घोषणा आधीच ठरलेली होती.
  • अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर हिंसक आंदोलनानंतर ही पावले उचलण्यात आलेली नाहीत.

नौदलाच्या वतीने व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठी,

  • भरती प्रक्रियेतील बहुतांश कामे झालेली आहेत.
  • हवाई दलाप्रमाणेच आमची भरती ऑनलाइन आहे.
  • 21 नोव्हेंबर 2022 रोजी चिल्का येथील बेसिक ट्रेनिंग सेंटरमध्ये पहिला अग्निवीर रिपोर्टींग सुरु करणार आहे.

हवाई दलाच्या वतीने एअर मार्शल एस.के.झा,

  • आयएएफ मधील भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरु होईल
  • त्याच दिवशी ऑनलाइन अधिसूचना जारी केली जाईल
  • महिन्याभरानंतर पहिल्या टप्यातील परीक्षेची प्रक्रिया 24 जुलैपासून सुरु होणार आहे.
  • डिसेंबरअखेर अग्निवीरांची पहिली उकाडा दाखल होणार आहे.
  • यानंतर 30 डिसेंबर पूर्वीच बॅचचे प्रशिक्षण सुरु होईल.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.