Nagpur ITI : नागपुरात 11 जुलैला शिकाऊ उमेदवार भरती मेळावा, आयटीआय उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, 1 हजार 239 जणांना मिळणार रोजगार
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायातील 1 हजार 239 जागाकरिता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. रहाटे कॉलनीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 11 जुलैला हे आयोजन करण्यात आलंय.
नागपूर : श्रद्धानंद पेठ, रहाटे कॉलनी (Rahate Colony) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 11 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजतापासून प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी तसेच ऑगष्ट २२ ला परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी या मेळाव्यात उपस्थित राहून सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. या आयोजित मेळाव्यात पुणे (Pune), औरंगाबाद व नागपूर येथील नामांकित कंपनी सहभागी होणार आहे. उमेदवारांनी सदर भरती मेळाव्याकरिता उपस्थित राहावे. पात्र उमेदवारांची निवड आस्थापनांनी करावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य हेमंत आवारे (Principal Hemant Aware) तसेच संस्थेचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार (वरिष्ठ) प्रमोद ठाकरे यांनी केले आहे.
कुणाला मिळणार संधी
पाचवी ते बारावीनंतर कौशल्य प्रमाणपत्र धारकांना, आयटीआय डिप्लोमा धारकांना तसेच पदवीधारकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायातील 1 हजार 239 जागाकरिता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. रहाटे कॉलनीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 11 जुलैला हे आयोजन करण्यात आलंय. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत भरती मेळावा होणार आहे.
कोणकोणत्या कंपन्या कसं मनुष्यबळ हवंय
औरंगाबादेतील एनआरबी बीअरिंग लिमिटेड पदं- फिटर, टर्नर, ग्रींडर, टीएलडी, मेनटनन्स या पदांसाठी बारामतीतील पायजीओ प्रायव्हेट लिमिटेड – एमएमव्ही, डिझल मेकॅनिकल, पेंटर, फिटर, वेल्डर, ऑटोमोबाईल, इंजिनीअरिंग डिप्लोमाधारक. हिंगण्यातील सविता ऑटोमोबाईल – फिटर, मशिनिस्ट, टर्नर, वेल्डर, ग्रींडर ऑपरेटर, टूल रूम, इलेक्ट्रिशियन. हिंगण्यातील महिंद्रा अँड महिंद्र कंपनी – पेंटर व वेल्डर हवेत. हिंगण्यातील एनएसएसएल प्रायव्हेट लिमिटेडला फिटर, टर्नर, मशिनिस्ट, सीएनसी ऑपरेटर हवेत. वैभव इंटरप्रायजेस नागपूरला फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टर्नर, इलेक्ट्रिशीयन हवे आहेत. बुटीबोरी येथील इरोज इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, एसईई टेक्निकल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, बुटीबोरीतील इंडोरामा सिंथेटिक, हिंगण्यातील दिशा इंजिनीअरिंग, नागपुरातील गिरनार मोटर्स आदी कंपन्यांना शिकाऊ उमेदवार हवे आहेत.