UGC चा मोठा निर्णय, 2023 पर्यंत असिस्टंट प्रोफेसर पदासाठी PhD ची गरज नाही

यूजीसीने विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी पात्रता म्हणून पीएचडीची अनिवार्य आवश्यकता संबंधित तारीख पुढे वाढवली आहे. हा निर्णय कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. यूजीसीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, "विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) कोविड -19 ची परिस्थिती पाहता विद्यापीठांच्या विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी पात्रता म्हणून पीएचडीच्या अनिवार्यतेबाबतची तारीख 1 जुलै 2021 पासून 1 जुलै 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी अधिसूचना जारी केली आहे."

UGC चा मोठा निर्णय, 2023 पर्यंत असिस्टंट प्रोफेसर पदासाठी PhD ची गरज नाही
'या' योजनांद्वारे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळतील पैसे, असा घ्या लाभ
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 3:15 PM

मुंबई : यूजीसीने विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी पात्रता म्हणून पीएचडीची अनिवार्य आवश्यकता संबंधित तारीख पुढे वाढवली आहे. हा निर्णय कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. यूजीसीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, “विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) कोविड -19 ची परिस्थिती पाहता विद्यापीठांच्या विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या थेट भरतीसाठी पात्रता म्हणून पीएचडीच्या अनिवार्यतेबाबतची तारीख 1 जुलै 2021 पासून 1 जुलै 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी अधिसूचना जारी केली आहे.”

दिल्ली विद्यापीठ शिक्षक संघाने (DUTA) या निर्णयाचे स्वागत केले आहे. DUTA अध्यक्ष राजीव राय म्हणाले की, हा निर्णय विद्यापीठाच्या विविध विभागातील तदर्थ शिक्षकांसाठी मोठा दिलासा आहे.

दिल्ली विद्यापीठाने 251 पदांसाठी रिक्त जागांची जाहिरात दिली आहे. डुटाच्या खजिनदार आभा देव हबीब म्हणाल्या की, शिक्षकांच्या संघटनेने नियुक्ती आणि पदोन्नतीशी संबंधित सर्व कलमांमध्ये शिथिलतेची मागणी केली होती जिथे पीएचडी अनिवार्य केली होती.

UGC NET परीक्षा स्थगित

यूजीसी नेट परीक्षेच्या (National Eligibility Test) तारखा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने वाढवल्या आहेत. ज्या उमेदवारांनी UGC NET परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते परीक्षेचा संपूर्ण तपशील पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट- ugcnet.nta.nic.in वर भेट देऊ शकतात. NTA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही परीक्षा 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान घेतली जाईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर एक अधिसूचना जारी केली असून त्यात म्हटले आहे की, उमेदवारांकडून आवेदने प्राप्त झाल्यानंतर परीक्षा ठेवण्यात आल्या आहेत. असेही म्हटले गेले आहे की यूजीसी नेट परीक्षेची तारीख इतर अनेक परीक्षांच्या तारखांसोबत येणार आहे. यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एनटीएने जाहीर केलेल्या माहितीनुसार, प्रवेशपत्रात परीक्षा केंद्र, तारीख, शिफ्ट आणि उमेदवारांच्या वेळेची माहिती असेल. UGC NET परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र एनटीए वेबसाईटवरुन डाउनलोड केलेले सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म, एक साधी बॉल पॉइंट पेन, हजेरी पत्रकावर जोडण्यासाठी अतिरिक्त छायाचित्रे आणि फोटो आयडी सोबत ठेवणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

ICSI CS Result 2021 : प्रोफेशनल एक्झिक्युटिव्हचा निकाल जाहीर; सीएस एक्झिक्युटिव्ह निकाल लवकरच

ONGC recruitment 2021: ओएनजीसीमध्ये 300 हून अधिक पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती, 1 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.