UPSC जिओ सायंटिस्ट भरती! एकूण 285 पदांसाठी परीक्षा, असा करा अर्ज
यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटला भेट देऊन सूचना तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने जिओ सायंटिस्टच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यंदा या परीक्षेच्या माध्यमातून एकूण 285 पदांची भरती होणार आहे. उमेदवारांना यूपीएससीच्या upsc.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटला भेट देऊन सूचना तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
UPSC Geo Scientist 2023: अर्ज प्रक्रिया
- अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in वर जा
- वेबसाइटच्या होम पेजवर What’s New च्या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर, Exam Notification: Combined Geo-Scientist (Preliminary) Exam, 2023 च्या लिंकवर जा.
- आता अर्ज करण्यासाठी Click Here to Apply वर क्लिक करा.
- पुढील पानावर मागितलेला तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- रजिस्ट्रेशन नंबर द्वारे तुम्ही अर्ज भरू शकता.
- अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रिंट आऊट घ्या.
UPSC Geo Scientist 2023 साठी थेट लिंक
- यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार भूवैज्ञानिक भरतीसाठी आजपासून म्हणजेच 21 सप्टेंबर 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
- उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2022 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
- अर्ज शुल्क जमा केल्यानंतरच या रिक्त जागेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण मानली जाईल. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क म्हणून 200 रुपये जमा करावे लागणार आहेत.
- एससी, एसटी आणि पीएच प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
- संघ लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार भूवैज्ञानिक गट अ च्या एकूण 216 पदांची भरती करण्यात येणार आहे.
- याशिवाय Geophysicist Group A च्या 21, केमिस्टच्या 19 आणि सायंटिस्ट बी च्या 29 पदांची भरती करण्यात येणार आहे.
टीप- अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पहा.
Non Stop LIVE Update