UPSC Recruitment 2021: यूपीएससीतर्फे ESIC मध्ये 151 पदांची भरती, पदवीधरांना मोठी संधी
केंद्रीय लोकसेवा आयोगाने ईएसआयसी मधील 151 पदांसाठी भरती पक्रिया जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांकडून ईएसआयसी मधील उपसंचालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
UPSC Recruitment 2021: नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने ईएसआयसी मधील 151 पदांसाठी भरती पक्रिया जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांकडून ईएसआयसी मधील उपसंचालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. कर्मचारी राज्य बीमा निगम ही संस्था केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत काम करते. या संस्थेत उपसंचालक पदावर भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात आलीय. यूपीएससीतर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील
एकूण151 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून त्यापैकी 66 पदं ही खुल्या प्रवर्गासाठी, 23 पदं अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 9 पदं अनुसूचित जमातीसाठी, 38 पदं ओबीसी प्रवर्गासाठी आर्थिक मागास प्रवर्गासाठी 15 तर 4 पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
अर्ज कुठे दाखल करायचा?
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीच्या ऑनलाइन रिक्रुटमेंट एप्लीकेशन पोर्टलवर अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 2 सप्टेंबर 2021 तर शुल्कर भरुन अर्ज सादर करण्याची मुदत 3 सप्टेंबर करण्यात आलीय.
शैक्षणिक पात्रता
कर्मचारी राज्य बीमा निगम मधील उपसंचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव
पात्र उमेदवाराकडे प्रशासन ,अकाउंट्स, मार्केटिंग, पब्लिक रिलेशन, इन्शुरन्स, रेव्हेन्यू इत्यादी मधील शासकीय, सार्वजनिक क्षेत्र किंवा स्वायत्त संस्थांकडील तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
फीची रक्कम
पात्र उमेदवारांना अर्जाचं शुल्क 25 रुपये भरावे लागणार आहेत. हे शुल्क स्टेट बँकेच्या शाखेत किंवा ऑनलाइन पद्धतीने देखील भरता येऊ शकते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती दिव्यांग आणि महिला उमेदवारांना फी मधून सूट देण्यात आली आहे. खुला प्रवर्ग, ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी कोणतीही सवलत देण्यात आलेली नसून त्यांना ती फी भरावी लागणार आहे.
यूपीएससीकडून संगणक आधारित परीक्षा दिल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीला बोलावले जाईल. त्यानंतर त्यांची निवड यूपीएससीतर्फे कर्मचारी राज्य बिमा निगममध्ये उपसंचालक पदावर केली जाईल. संगणक आधारित परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.
इतर बातम्या:
UBI Recruitment 2021 : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजरसह 347 पदांसाठी भरती, असा करा अर्ज
UPSC Recruitment 2021 union public service commission invited application for deputy director of ESIC