UPSC Exam Calendar: यूपीएससीकडून 2022 च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, ‘इथे’ पाहा परीक्षांच्या तारखा

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीच्या सीडीएस, एनडीए, आयईएस, सीआयएसएफ सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी upsc.gov.in ला भेट देऊन वेळापत्रक पाहावं.

UPSC Exam Calendar: यूपीएससीकडून 2022 च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 'इथे' पाहा परीक्षांच्या तारखा
यूपीएससीच्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचे यश
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 5:41 PM

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीच्या सीडीएस, एनडीए, आयईएस, सीआयएसएफ सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी upsc.gov.in ला भेट देऊन वेळापत्रक पाहावं. 2022 मधील यूपीएससीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होतील.

यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 2022 च्या सर्व परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतील. 2021 मध्येही काही परिक्षांचं नोटिफिकेशन जारी केलं जाणार आहे. अभियांत्रिकी सेवा 2022, संयुक्त जीईओ सायंटिस्ट सारख्या परीक्षांचा त्यामध्ये समावेश असेल. या परीक्षांची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी केली जाईल. CISC परीक्षा 2022 चे वेळापत्रक 1 डिसेंबर रोजी जारी केले जाईल.

2022 मधील केंद्रीय लोकसेवा आयोगाचं परीक्षांचं वेळापत्रक कसं पाहायचं?

-परीक्षांचं वेळापत्रक पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in वर भेट द्या.

-वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर Whats New वर क्लिक करा.

– यापुढे परीक्षा लिंकवर क्लिक करा

– यापुढे कॅलेंडरवर क्लिक करा.

यानंतर वार्षिक कॅलेंडर 2022 च्या लिंकवर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर कॅलेंडरचे PDF ओपन होईल.

थेट लिंकवरून कॅलेंडर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

परीक्षेच्या तारखा

  1. अभियांत्रिकी सेवा (प्रारंभिक) परीक्षा 2022 / एकत्रित भू-शास्त्रज्ञ (प्राथमिक) परीक्षा 2022: 20 फेब्रुवारी 2022
  2. CISF AC (EXE) LDCE-2022: 13 मार्च 2022
  3. NDA आणि NA परीक्षा (I), 2022/ CDS परीक्षा (I), 2022: 4 एप्रिल 2022
  4. नागरी सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2022 / भारतीय वन सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2022, CS (P) परीक्षा 2022: 5 जून 2022
  5. IES/ISS परीक्षा, 2022: 24 जून 2022
  6. एकत्रित भू-वैज्ञानिक (पुरुष) परीक्षा, 2022: 25 जून 2022
  7. अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा, 2022: 26 जून 2022
  8. एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा, 2022: 17 जुलै 2022
  9. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (ACs) परीक्षा 2022: 7 ऑगस्ट 2022
  10. NDA आणि NA परीक्षा (II), 2022 / CDS परीक्षा (II), 2022: 4 सप्टेंबर 2022
  11. नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2022: 16 सप्टेंबर 2022
  12. भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा 2022: 20 नोव्हेंबर 2022
  13. SO/स्टेनो (GD-B/GD-I) LDCE: 10 डिसेंबर 2022
  14. UPSC RT/परीक्षा: 18 डिसेंबर 2022

परीक्षांच्या तारखा बदल शक्य

यूपीएससीच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये परीक्षेच्या तारखांमध्ये परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात, असं सांगण्यात आलं आहे. कॅलेंडरनुसार, NDA आणि CDS दोन्ही परीक्षा 10 एप्रिल रोजी एकाच दिवशी घेण्यात येतील. त्याची दुसरी लेखी परीक्षा 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर अधिक माहिती आणि नव्या अपडेटस उपलब्ध होईल.

इतर बातम्या:

BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 पदांवर संधी, अर्ज करण्याची शेवटची संधी

CRPF Recruitment 2021: सीआरपीएफमध्ये पॅरामेडिकल स्टाफची मोठी भरती, 2439 पदांवर थेट भरती

UPSC released Exam Calendar 2022 Schedule for CDS NDA IES CISF Exams

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.