UPSC : बाबो ! पोरं कुठं कुठं बसून अभ्यास करतात बघा ! अधिकारी व्हायला मेहनत लागते, वायरल फोटोचं देशभरातून कौतुक
स्पर्धा परीक्षा म्हटलं की कष्ट करणारेही आलेच. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनत काही नवीन नाही. सध्या अशाच मेहनती विद्यार्थ्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होतायत.
पटना : स्पर्धा परीक्षा म्हटलं की कष्ट करणारेही आलेच. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students) मेहनत काही नवीन नाही. सध्या अशाच मेहनती विद्यार्थ्यांचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड वायरल (Viral) होतायत. विद्यार्थी आहेत बिहारचे ! बिहारच्या घराघरांत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुलं-मुली आहेत. बिहार राज्यच मुळात या कारणासाठी ओळखलं जातं. देशात जितक्या मोठ्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या ही बिहारच्या विद्यार्थ्यांची असते असं म्हटलं जातं. रेल्वेच्या आरआरबी ग्रुप डी भरती परीक्षेला देशातून 1.15 करोड विद्यार्थी बसलेत त्यातले तब्बल 5 लाख विद्यार्थी हे एकट्या बिहार राज्यातून आहेत.काही दिवसांपूर्वी उद्योगपती हर्ष गोएन्काने एक फोटो ट्विट केला होता. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झालाय.
या फोटोतील मुलं ही बिहारची राजधानी पाटना मधील आहेत. गंगा नदीच्या काठावर बसून अभ्यास करणाऱ्या या मुलांचा फोटो हर्ष गोएन्का यांनी शेअर करत म्हटलंय,’ पटना, बिहारमधील मुलं गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून स्पर्धा परीक्षांची तयार करतायत.आशा आणि स्वप्नांचा हा फोटो आहे.’
Kids in Patna, Bihar studying for competitive exams on the banks of river Ganges. It’s a picture of hope and dreams. via @ParagonWorli18 pic.twitter.com/4yLn6mmWD9
— Harsh Goenka (@hvgoenka) April 4, 2022
रिपोर्ट्स नुसार फोटोमध्ये दिसणारे विद्यार्थी हे बरेचशे पटना युनिव्हर्सिटी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी रोज पहाटे 4 ते 6 या वेळेत गंगा घाटावर एकत्र येतात आणि तिथे बसून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. पटना विश्वविद्यालय आणि या विद्यापीठाशी संबंधित मान्यता प्राप्त असलेले अनेक कॉलेजेस गंगा किनारी स्थित आहेत. खूप दिवसांपासून अनेक विद्यार्थी इथे पहाटे येऊन अभ्यास करतात.
रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर बसून अभ्यास
बिहारच्या मुलांचा असा फोटो पहिल्यांदा वायरल झालेला नाही. बरेचदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा फोटो वायरल झालेला आहे. 2021 च्या ऑक्टोबर महिन्यात एका आयएएस अधिकाऱ्याने देखील असाच एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता ज्यात विद्यार्थी चक्क रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर बसून अभ्यास करताना दिसून आले.
For two hours every morning and evening, both the platforms 1 and 2 of the railway station turn into a coaching class for young people who are aspirants for the Civil Services.
Excellent Initiative.??
Courtesy: Anuradha Prasad ILSS. pic.twitter.com/pLMkEn4AOF
— Awanish Sharan (@AwanishSharan) October 2, 2021
बिहारच्या मुलांच्या या मेहनतीचं कायमच देशभरातून कौतुक केलं गेलंय.
इतर बातम्या :