Railway Jobs: झुक झुक झुक…आली भरती! विनापरीक्षा होणार भरती! कोण कोणती पदं पाहुया, पटकन अर्ज भरूया…

अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या 10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर विविध ठिकाणी नियुक्ती मिळेल. अप्रेंटिसशिप 1 वर्षाची असेल आणि यादरम्यान उमेदवारांना निश्चित स्टायपेंड दिला जाईल.

Railway Jobs: झुक झुक झुक...आली भरती! विनापरीक्षा होणार भरती! कोण कोणती पदं पाहुया, पटकन अर्ज भरूया...
झुक झुक झुक...आली भरती!Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 1:34 PM

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) अंतर्गत भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आलीये. एकूण 3612 जागांसाठी ही भरती सुरु करण्यात आलीये. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (Online Application)आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असणारे उमेदवार 27 जून 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. या पदांसाठी विना परीक्षा सिलेक्शन होणार आहे. इच्छुक उमेदवार 50% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या 10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर विविध ठिकाणी नियुक्ती मिळेल. अप्रेंटिसशिप 1 वर्षाची असेल आणि यादरम्यान उमेदवारांना निश्चित स्टायपेंड दिला जाईल. फिटर,वेल्डर,कारपेंटर ,पेंटर,डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक (मोटार व्हेईकल), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,वायरमन, Reff. & AC मेकॅनिक,पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), PASAA, स्टेनोग्राफर, मशीनिस्ट, टर्नर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. वयाची अट, शैक्षणिक पात्रता याबद्दलची सविस्तर माहिती आणि अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

भरती प्रक्रिया: विनापरीक्षा

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या 10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करणार
  • गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर विविध ठिकाणी नियुक्ती
  • अप्रेंटिसशिप कालावधी 1 वर्ष – स्टायपेंड दिला जाईल.

पदाचे नाव व पदसंख्या

एकूण पदसंख्या : 3612

  • फिटर 941
  • वेल्डर 378
  • कारपेंटर 221
  • पेंटर 213
  • डिझेल मेकॅनिक 209
  • मेकॅनिक (मोटार व्हेईकल) 15
  • इलेक्ट्रिशियन 639
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 112
  • वायरमन 14
  • Reff. & AC मेकॅनिक 147
  • पाईप फिटर 186
  • प्लंबर 126
  • ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 88
  • PASAA 252
  • स्टेनोग्राफर 08
  • मशीनिस्ट 26
  • टर्नर 37

शैक्षणिक पात्रता

  • 50% गुणांसह 10वी परीक्षा उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT

वयाची अट

27 जून 2022 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

हे सुद्धा वाचा

शुल्क

  • 100/- रुपये
  • SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही

इतर माहिती

  • वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
  • नोकरी ठिकाण : पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

महत्त्वाचे

टीप: कृपया अधिक आणि अधिकृत माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला rrc-wr.com भेट द्यावी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.