IBPS RRB Salary : सुखाची नोकरी, गलेलठ्ठ पगार!  बँकेची ही परीक्षा व्हा पास

IBPS RRB Salary : सुखाची नोकरी आणि गलेलठ्ठ पगार हवा असेल तर आता मोठी संधी आहे...बँकिंग कर्मचारी निवड संस्थेची परीक्षा पास झाल्यास तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील.

IBPS RRB Salary : सुखाची नोकरी, गलेलठ्ठ पगार!  बँकेची ही परीक्षा व्हा पास
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 6:34 PM

नवी दिल्ली : सुखाची नोकरी आणि गलेलठ्ठ पगार कोणाला नको असतो. पण त्यासाठी सुरुवातीला मेहनत करावी लागते. सरकारी बँकेत करिअर करण्याची इच्छा असेल तर मग ही संधी तुमच्यासाठीच आहे. आयबीपीएस आरआरबी ही बँकिंग कर्मचारी निवड संस्थेद्वारे (IBPS) आयोजित राष्ट्रीय स्तरावरची एक बँकिंग परीक्षा आहे. क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये ज्यांना काम करायचे असेल, त्यांच्यासाठी ही परीक्षा आहे. ही परीक्षा क्रॅक केल्यास तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील. IBPS RRB अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवाराला विविध पदांसाठी वेगवेगळे वेतन देण्यात येते. पदानुसार हे वेतन असते.

काय आहे बँकिंग परीक्षा बँकेतील नोकरीसाठी IBPS बँकिंग परीक्षा आयोजीत करते. ग्रुप A, ग्रुप B, IBPS कार्यालयीन सहायक पदासाठी भरती प्रक्रिया आणि परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. IBPS RRB परीक्षा IBPS वर्षातून एकदा आयोजीत करते. IBPS RRB 2023 चे वेतन पदांनुसार वेगवेगळे असते. जर तुम्ही IBPS RRB अंतर्गत या पदांवर नोकरी करु इच्छित असाल तर तयारी करा आणि परीक्षा उत्तीर्ण करा.

वेतन, भत्ते अमाप IBPS RRB भरती प्रक्रियेत ऑफिसर स्केल I (PO), ऑफिसर स्केल- II ( सामान्य आणि विशेषज्ञ) आणि IBPS RRB बहुउद्देशीय कार्यालय सहाय्यक (लिपिक) पदांचा आंतर्भाव आहे. IBPS RRB वेतनासोबतच उमेदवाराला अनेक लाभ आणि अनुषांगिक भत्ते मिळतात.

हे सुद्धा वाचा

IBPS RRB इतका पगार IBPS RRB अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवाराला विविध पदांसाठी वेगवेगळे वेतन देण्यात येते. पदानुसार हे वेतन असते. जबाबदारीनुसार वेतनासह उमेदवारांना अनुषांगिक लाभ देण्यात येतात.

IBPS RRB भत्ते आणि लाभ

महागाई भत्ता (DA) : केंद्र सरकारकडून बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना IBPS RRB PO वा लिपिकाला मुळ वेतनावर 46.5% इतका महागाई भत्ता मिळता. डीएमध्ये दर 3 महिन्यानंतर बदल होतो.

हाऊस रेंट अलाउंस (HRA) : HRA कर्मचाऱ्यांना त्यांच्या घराचा किराया भरण्यासाठी देण्यात येते. शहरानुसार, या भत्त्यात वाढ होते. प्रत्येक ठिकाणचा HRA स्वतंत्र असतो. ग्रामीण क्षेत्रात मुळ वेतनाच्या 5% एचआरए मिळतो. निमशहरी भागातील कर्मचाऱ्याला मुळ वेतनावर 7.5% भत्ता, शहरी भागातील कर्मचाऱ्याला मुळ वेतनावर 10% एचआरए मिळतो.

विशेष भत्ता (SA): विशेष भत्ता मुळ वेतनाच्या 7.75% मिळतो. SA पूर्वी देण्यात येत नव्हता. जानेवारी 2016 पासून तो लागू करण्यात आला आहे.

IBPS RRB अन्य भत्ते IBPS RRB प्रथमश्रेणी अधिकारी आणि कार्यालयीन सहायक यांना भत्ते (i) प्रवास भत्ता (ii) निवासी भाडे (iii) न्यूज पेपर रिम्बर्समेंट (iv) मेडिकल पॉलिसी (v) नवीन निवृत्ती योजनेचा लाभ

सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.