शिक्षकाच्या थप्पड़ की गूंज भलतीच डेंजर, विद्यार्थी थेट ऑपरेशन टेबलवर; काय घडलं ‘त्या’ शाळेत ?

संगीत शिक्षकांच्या एका थपडेचा आवाज एवढ्या जोरात आला की विद्यार्थी थेट हॉस्पिटलमध्येच पोहोचला. त्या शाळेत नेमकं काय घडलं ? शिक्षकांचा पारा का चढला, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

शिक्षकाच्या थप्पड़ की गूंज भलतीच डेंजर, विद्यार्थी थेट ऑपरेशन टेबलवर; काय घडलं 'त्या' शाळेत ?
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 1:27 PM

भोपाळ | 13 सप्टेंबर 2023 : छडी लागे छमछम, विद्या येई घमघम ! आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी हे गाणं अनेकवेळा ऐकलं असेल. काहींनी शिक्षकांच्या हातचा मारही खाल्ला असेल. शिक्षक आणि शिक्षा (punishment) हे काही नवं समीकरण नाही. पण मध्य प्रदेशमध्ये एका शिक्षकाने केलेली शिक्षा विद्यार्थ्याला भलतीच महागात पडली. शिक्षकाच्या शिक्षेमुळे तो विद्यार्थी थेट हॉस्पिटलमध्येच, ऑपरेशन थिएटरमध्येच (serious injury) जाऊन पोहोचला. नक्की काय झालं ? त्या शिक्षकाला एवढा राग नेमका का आला ?

मध्य प्रदेशातील रीवा येथे ही काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे. तेथे एका म्युझिक टीचरने (संगीत शिक्षक) अवघ्या १२ वर्षांच्या मुलाला एवढ्या निर्दयीपणे मारले की त्याच्या डोक्याला बेदम मार लागला आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना ऑपरेशन करावे लागले. सध्या या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून तो ICU मध्ये आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र तेव्हापासूनच आरोपी शिक्षक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

का चढला शिक्षकांचा पारा ?

ही धक्कादायक घटना, भास्कर स्कूल हायर सेकेंडरी स्कूल येथील आहे. 28 ऑगस्ट रोजी 12 वर्षांचा हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. वर्गात म्युझिक टीचरनी प्रवेश केला. मात्र तेव्हा विद्यार्थी त्यांच्या सन्मानार्थ नीट उभा राहू शकला नाही. ही गोष्ट , शिक्षक ऋषभ पांडे यांना बिलकूल आवडली नाही आणि ते संतापले. रागाच्या भरातच त्यांनी विद्यार्थ्याच्या कानाखाली जोरदार थप्पड लगावली. त्यावेली शिक्षकाने हातात रुद्राक्षांची माल घातली होती. ती देखील त्या विद्यार्थ्याला लागल्याने डोक्याला गंभीर मार लागला. त्याचे डोळेही सुजले. अशाच अवस्थेत, रडत रडत तो विद्यार्थी कसाबसा घरी पोहोचला आणि आईला सर्व प्रकार सांगितला. तिने त्याला तात्पुरते औषध देऊन मलमपट्टी केली, पण तीन दिवसानंतरही विद्यार्थ्याची तब्येत सुधारली नाही. उलट त्याला खूप ताप आला आणि प्रकृती आणखनीच बिघडली. तेव्हा त्याला उपचारांसाठी तातडीने संजय गांधी मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

नागपूरमध्ये केले ऑपरेशन

तेथे त्या विद्यार्थ्याचे एमआरआय आणि सीटी स्कॅन करण्यात आले, ज्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर होत होती. त्यामुळे न्यूरो सर्जननी त्याला जबलपूरला नेण्यास सांगितले. जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये काही दिवस उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्याने अखेर त्या विद्यार्थ्याला नागपूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले. अखेर नागपुरातील हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी 11 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्याच्या डोक्यावर गुंतागुंतीचे ऑपरेशन करून त्याचे प्राण वाचवले. या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला अजूनही आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी आरोपी शिक्षकावरव गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.