आफताब पुनावालाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबईजवळील वसईची रहिवासी असलेल्या 26 वर्षीय श्रद्धा वालकरची 18 मे 2022 रोजी दिल्लीत हत्या झाली होती. तिचा लिव्ह-इन-पार्टनर आफताब पूनावाला यानेच श्रद्धाची हत्या करीत तिच्या शरीराचे अनेक तुकडे करीत ते दिल्लीच्या जंगलात लपवले होते. श्रद्धा हरवल्याचे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

आफताब पुनावालाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
WALKARImage Credit source: WALKAR
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 5:45 PM

दिल्ली : आपल्या लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकर हिचा अत्यंत निघृण हत्या करीत तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलीसांनी अटक केलेल्या आरोपी आफताब पुनावाला याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्लीच्या साकेत कोर्टाने दिले आहेत. आरोपीच्या मागणीवरून न्यायालयाने त्याला तुरूंगात कायद्याची पुस्तके तसेच गरम कपडे पुरविण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात श्रद्धाच्या डीएनए चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तिची हत्या केल्यानंतर लपविलेले अवयव शोधण्यात यश आले होते. त्या हाडांच्या डीएनए नमून्यांशी तिच्या वडीलांचा डीएनए जुळला आहे. त्यामुळे घटनास्थळावरून सापडलेले केस आणि हाडे ही श्रद्घा वालकर हीचीच असल्याचे स्पष्ठ झाले आहे.

या नमून्यांचा मायटोकॉन्ड्रीयल डीएनए रिपोर्ट श्रद्धाचे वडील आणि भाऊ यांच्याशी जुळत आहे. हे नमुने हैदराबादमधील डीएनए फिंगरप्रिंटिंग डायग्नोस्टिक्ससाठी लायब्ररी सेंटरमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. 18 मे 2022 रोजी, आफताब पूनावाला याने लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केला होता.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून ते फ्रीझमध्ये ठेवले होते, त्यानंतर हे तुकडे दिल्लीच्या जंगलात फेकण्यास सुरुवात केली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये, जेव्हा श्रद्धाच्या वडिलांनी श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली, तेव्हा हे प्रकरण चर्चेत आले. आरोपी आणि मृत दोघेही महाराष्ट्राचे रहिवासी असून ते मे महिन्यात दिल्लीत स्थलांतरित झाले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.