अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले, मग गुंतवणुकीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

मुलगी प्रसिद्ध बालकलाकार आहे. यामुळे मुलीचे सोशल मीडियावर अनेक फॅन्स आहेत. याच गोष्टीचा गैरफायदा घेत मुलीच्या आईने जे केले त्यानंतर सर्वच अवाक् झाले आहेत.

अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले, मग गुंतवणुकीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलेची फसवणूक
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 12:38 AM

मुंबई : गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून 15 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका बालकलाकाराच्या आईला अटक करण्यात आली आहे. पूजा भोईर असे आरोपी महिलेचे नाव आहे. मयुरेश पत्की यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कफ परेड पोलिसात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. आरोपी महिलेची मुलगी ही टीव्ही मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम करते. फसवणूक झालेली महिला ही आरोपीच्या मुलीची फॅन आहे. याचाच फायदा घेत आरोपी महिलेने गुंतवणूक करण्यास सांगत तिची फसवणूक केली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडिता आरोपीच्या संपर्कात आली

मयुरेश पत्की यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी नेहा ही पूजाची मुलगी आणि बालकलाकार असलेल्या चिमुरडीची चाहती आहे. ती इन्स्टाग्रामवर मुलीला फॉलो करते आणि 2022 मध्ये सोशल मीडियाद्वारे आरोपीच्या संपर्कात आली. दोन्ही महिलांमध्ये मैत्री झाली आणि मग दोघींचे कॉलवर बोलणे सुरू केले.

एकदा चर्चेदरम्यान पूजाने नेहाला सांगितले की, तिचा गुंतवणुकीचा व्यवसाय आहे आणि ती प्रत्येक आठवड्यात 10.10% नफा मिळवण्यासाठी त्यात गुंतवणूक करू शकते. नेहाने सहज सहमती दर्शवली आणि 6 लाख रुपये गुंतवले आणि त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये 9 लाख रुपयांचा आणखी एक व्यवहार झाला.

हे सुद्धा वाचा

‘अशी’ उघड झाली फसवणूक

एका महिन्यानंतर, पूजाने नेहाच्या बँकेत 42,420 रुपये नफा ट्रान्सफर केला आणि काही दिवसांनी 70,700 रुपये दिले. मात्र, मार्चमध्ये पूजाने दिलेले चेक बाऊन्स झाले. नेहाने पूजाकडे याबाबत विचारणा केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर मयुरेश यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करत पोलिसांकडे धाव घेतली.

फसवणूक प्रकरणी आरोपी महिलेविरोधात भारतीय दंड संहिता कलम 420 (फसवणूक) आणि 406 (गुन्हेगारी विश्वासभंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र रणमाळे यांनी सांगितले की, पूजाने आणखी कुणाची अशी फसवणूक केली आहे का? याचा तपास करत आहेत.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.